घोटी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:32+5:302021-05-11T04:14:32+5:30
घोटी : कोरोनाचे सावट दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरात बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत ...
घोटी : कोरोनाचे सावट दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरात बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. प्रशासन आदेशाच्या निर्बंधांना धाब्यावर बसवून फिजिकल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होत असल्याने, स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून प्रशासनाच्या वतीने शनिवार, रविवार संपूर्ण बंद, तसेच दैनंदिन ७ ते ११ पर्यंत जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणे, मोठ्या प्रमाणात गर्दी करणे नित्याचेच झाले असल्याने निर्बंधांना हरताळ फासताना नागरिक सर्वत्र दिसत आहेत. सोमवारी घोटी शहरातील मुख्य रस्ता, जैन मंदिर ते मारुती मंदिर, वासुदेव चौक, भंडारदरा रोड, श्रीरामवाडी या ठिकाणी यात्रेचे स्वरूप दिसून आले. या ठिकाणी भाजीपाला, किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत होते. बँकासमोरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा मोठा धोका असतानाही मोठ्या प्रमाणात बँकेबाहेर उन्हात वयोवृद्ध गर्दी करत होते. अनावश्यक गर्दींना आळा घालण्यासाठी प्रशासन, स्थानिक पोलीस स्टेशनने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
--------------------
शहरातील कोरोनाची स्थिती
घोटी शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४३० वर जाऊन पोहोचली असून, ३७४ रुग्ण बरे झाले आहेत.
सद्यस्थितीत ४० रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सात ॲक्टिव्ह झोन असून, अधिक सतर्कतेची गरज असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. (१० घोटी २/३)
===Photopath===
100521\10nsk_17_10052021_13.jpg
===Caption===
१० घोटी ३