हॉटेल्समध्ये गर्दी उदंड, पाच हजारांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:27+5:302021-03-14T04:15:27+5:30

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे. सायंकाळी सात वाजता दुकाने बंद ठेवतानाच ...

Crowds in hotels, a whopping five thousand | हॉटेल्समध्ये गर्दी उदंड, पाच हजारांचा भुर्दंड

हॉटेल्समध्ये गर्दी उदंड, पाच हजारांचा भुर्दंड

Next

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे. सायंकाळी सात वाजता दुकाने बंद ठेवतानाच शनिवार आणि रविवार दोन दिवस तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. हॉटेल्स चालकांना त्यातून वगळले असले तरी त्यांना एकूण ग्राहक क्षमतेच्या पन्नास टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होत असले तरी कर्मचारी पातळीवर कारवाई होईलच असे नाही त्यामुळे आयुक्त कैलास जाधव हे स्वत:च रस्त्यावर उतरले असून त्यांनी पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, मनपाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या समवेत गंगापूर रोडवरील हॉटेल पक्वान आणि ग्रीन फिल्ड येथील कृष्णा हाॅटेल येथे अचानक भेट दिली. त्यावेळी हॉटेल्स मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक होते. त्यामुळे हॉटेल चालकांना ऑन द स्पॉट दंड करण्यात आला.

इन्फो...

मास्क न वापरणाऱ्यांनाही दंड

महापालिका आयुक्त कैलास जाधव हॉटेल्सची झाडाझडती घेत असताना अनेक ग्राहक आणि नागरिक परिसरात जमले होते. हीच वेळ साधून कर्मचाऱ्यांनी तत्काळ मास्क न लावणाऱ्यांना हेरले आणि त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली.

===Photopath===

130321\13nsk_52_13032021_13.jpg

===Caption===

कॉलेजरोडवरील हॉटेलची पाहणी करताना महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि पाेलीस उपआयुक्त अमेाल तांबे, समवेत विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे

Web Title: Crowds in hotels, a whopping five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.