कैरी खरेदीसाठी बाजारपेठेत गृहिणींची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:03 PM2020-06-16T21:03:18+5:302020-06-17T00:22:33+5:30
वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्याने हळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे.
वरखेडा : सध्या सर्वत्र कोरोनाच्या सावटामुळे लॉकडाऊन असल्याने
हळूहळू दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठेमध्येही नागरिकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. चटकदार लोणचे टाकण्यास आवश्यक असलेली कैरी खरेदीसाठी दिंडोरी बाजारात गृहिणींची गर्दी होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पाच ते सहा दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. महिलांची सध्या लोणचे टाकण्याासाठी लगबग सुरू आहे. कैऱ्यांच्या खरेदीनंतर महिला बाजारातून लोणच्यासाठी हवे तसे तुकडे करून नेत आहेत.
---------------------
यावर्षी बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या झाडाचा मोहोर गळून पडल्याने आंब्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कैऱ्यांचे बाजार दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढले असून, ५० ते ६० रु पये किलो दराने विक्र ी होत आहेत. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम कैºया खरेदीवर झालेला दिसून येत आहे.
उन्हाळ्यातील वाळवणाप्रमाणे जेवणात लोणचे हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या दिवसात महिलावर्ग
लोणचे ेटाकण्यात व्यस्त असतात.
बाजारात आंब्याची
आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याने सध्या लोणच्याच्या कैºयांना अधिक मागणी आहे.
यंदा कैºयांची चढ्या दराने विक्री होताना दिसत आहे. कैºयांसोबत बाजारात लोणच्यासाठी कैºयांचे तुकडे करून देणाºयांच्या हातांना काम मिळाले आहे.
----------------
लोणचे टाकण्या-साठी कैरी खरेदी करताना आम्हा गृहिणींची गर्दी होत असते. परंतु सध्या कोरोना काळात खूपच सावधानता बाळगावी लागत आहे.
- संगीता राऊत, गृहिणी, सारसाळे
तीन महिन्यां-पासून बाजारपेठा बंद होत्या. कोरोना आजाराच्या धास्तीने ग्राहक मिळत नाही. तसेच जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला बसून ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे.
- पांडुरंग टोगारे, विक्र ेता, कोचरगाव