संदिग्ध शासन आदेशामुळेच रस्त्यांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:40+5:302021-06-03T04:11:40+5:30
हॉटेल रेस्टॉरंट, फूड स्टॉल, खानावळ, महामार्ग व रस्त्यालगतचे ढाबे व रेस्टॉरंट तसेच मद्यविक्री संदर्भात सध्याच्या शासकीय अधिसूचनेनुसार प्रचलित पद्धत ...
हॉटेल रेस्टॉरंट, फूड स्टॉल, खानावळ, महामार्ग व रस्त्यालगतचे ढाबे व रेस्टॉरंट तसेच मद्यविक्री संदर्भात सध्याच्या शासकीय अधिसूचनेनुसार प्रचलित पद्धत तशीच पुढे सुरू राहील असे या आदेशात नमूद करण्यात आल्याने हा व्यवसाय सुरू करावा की नाही असा प्रश्न व्यावसायिक विचारू लागले आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थ व पार्सल व होम डिलिव्हरीबाबत वेळा निश्चित करून देण्यात आल्याचे आदेशात नमूद असल्याने या संभ्रमात आणखीनच भर पडली आहे.
चौकट====
सार्वजनिक वाहतुकीबाबत सोयीने अर्थ
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांना परवानगी दिलेल्या कामांसाठीच अनुज्ञेय राहील असेही या आदेशात म्हटले असून, तथापि, यासाठी पूर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहील असेही पुढे म्हटले आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठीच जर प्रवासाची मुभा असेल तर त्याला आळा कसा घालणार असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.