मंदिरे उघडताच सप्तशृंगगडावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:08 AM2020-11-20T00:08:56+5:302020-11-20T01:25:22+5:30
वणी : मंदिरे उघडताच तसेच पर्यटन स्थळावरील निर्बंध शिथिल केल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढली असून, गडावरील खासगी लॉजिंग व वणीतील हॉटेल हाऊस फुल्ल झाली आहेत.
वणी : मंदिरे उघडताच तसेच पर्यटन स्थळावरील निर्बंध शिथिल केल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढली असून, गडावरील खासगी लॉजिंग व वणीतील हॉटेल हाऊस फुल्ल झाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सप्तशृंगगड वणीची जगदंबा शिर्डी येथील साईबाबा व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भाविकांची हजेरी वाढते आहे. प्रामुख्याने गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविक महाराष्ट्रात सापुतारा-वणीमार्गे येत आहेत. सप्तशृंग गडावर दर्शन भटकंती व निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन नैसर्गिक आनंदाचा आस्वाद घेत आहेत. गडावरील भक्तनिवास बंद असल्याने खासगी लॉजवर ताण वाढला आहे. गेल्या सात महिन्यापासून बंद असलेल्या हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. रस्त्यावर खासगी वाहनांच्या वर्दळीमुळे वणी- सापुतारा, वणी-पिंपळगाव, वणी-नाशिक रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.