बंदी असतानाही इगतपुरीत पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:37+5:302021-07-11T04:11:37+5:30
इगतपुरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी असतानाही शनिवारी (दि.१०) वीकेंडला इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात ...
इगतपुरी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी असतानाही शनिवारी (दि.१०) वीकेंडला इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. शनिवार व रविवारी पूर्णत: लॉकडाऊन केले असून जमावबंदीचा आदेश आहे. असे असतानाही आदेशाचे उल्लंघन होत आहे.
पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानेदेखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. पर्यटन स्थळावर शनिवार आणि रविवारी जमावबंदी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भावली धरणाकडे जाणाऱ्या पिंप्रीसदो फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी तैनात केले आहेत. पर्यटकांना रोखले जात असल्याने त्याचा फटका पिंप्रीसदो, भावली, आंबेवाडी, जामुंडे, गव्हांडा येथील स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे काही स्थानिक नागरिक, भावली धरण परिसरातील मोठे व्यावसायिक, पर्यटक यांचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद देखील बघावयास मिळत आहेत. पोलीस बंदोबस्त असला तरी काही पर्यटकांना भावली धरण परिसरात सोडले जात असल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.
फोटो- १० भावली डॅम
भावली परिसरातील स्थानिक व्यावसायिक व वाहतूक शाखेच्या पोलिसांत वाद नित्याचाच झाला आहे.
100721\10nsk_35_10072021_13.jpg
फोटो- १० भावली डॅमभावली परिसरातील स्थानिक व्यावसायिक व वाहतुक शाखेच्या पोलिसांत वाद नित्याचाच झाला आहे.