निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:15 PM2020-08-17T15:15:05+5:302020-08-17T15:15:33+5:30

ठाणगाव (नितिन शिंदे )- सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे.

Crowds of tourists in Thangaon Ghat to experience nature | निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी

निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी

Next
ठळक मुद्दे यापेक्षा निसर्ग आणखी जवळून बघण्यासाठी ठाणगावमार्गे अनेक पर्यटक विश्रामगडाकडे जातांना दिसत आहे

ठाणगाव :  सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे.
डुबेरवाडीच्या दक्षिणेस जसजसे पुढे जाऊ तसतसे रस्त्याच्या दोन्ही बाजूनां डोंगरावरुन कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळी पर्यटकांची मज्जा घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक या परिसरात येतांना दिसत आहे. यंदा पावसाने उशीरा का होईना सतंतधार पडणाºया पावसामूळे धबधबे खळखळू लागले आहे.पाऊस आणि वा-याच्या जुगलबंदीमूळे डोंगरावरुन कोसाळणा-या धबधब्याचे पाणी पुन्हा डोंगरावर उडून मन मोहून टाकणारा नजरा पाहावयास मिळत आहे .डुबेरेपासून ठाणगाव पर्यंतचा निसर्ग रम्य परिसर सेल्फीप्रेमीसाठी खास आकर्षक ठरत आहे. ठाणगाव घाटातील देवीची खिंड ओलांडल्यानंतर पुढे डाव्या बाजूचा रस्ता पवनचक्काकडे जातो.चारचाकी थेट डोंगरावर जात आसल्याने निसर्ग प्रेमी गर्दी करतांना दिसत आहे . सेल्फीप्रेमीचे डिपीसुध्दा बदलतांनाचे चिञ तालुक्यात दिसत आहे. सिन्नर शहरापासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावरील निसर्ग अनुभवण्यासाठी शहरवासिय तरुणाबरोबरच आबालवृध्दांना ठाणगाव घाटातील परिसर आकर्षित करु लागला आहे. यापेक्षा निसर्ग आणखी जवळून बघण्यासाठी ठाणगावमार्गे अनेक पर्यटक विश्रामगडाकडे जातांना दिसत आहे (१७ ठाणगाव १ ते ४)

सिन्नरपासून अवघ्या १५ किलोमीटरवर अंतरावर आसणा-या ठाणगाव घाटातील परिसर हिरवाईने नटला आहे. गेल्या २० वर्षापासून आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो आहे प्रत्येक वर्षी या परिसराला भेट देऊन निसर्गसौंदर्य न्याहळत असतो. पाऊस आणि त्यातून निर्माण झालेली हिरवी चादर पर्यटकांना आकर्षित करत असून पाण्याची धब धबे बघून मन प्रसन्न होत आहेत जणू आपण महाबळेश्वर सारख्या ठिकाणावर आलोय की काय असा भास होते आणि मन प्रसन्न झाल्या शिवाय राहत नाही.
- देवा सांगळे, पर्याटक, सिन्नर

Web Title: Crowds of tourists in Thangaon Ghat to experience nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.