अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:01 PM2021-05-06T22:01:47+5:302021-05-07T00:49:43+5:30

लोहोणेर : कोरोना लस मिळावी म्हणून येथील आरोग्य केंद्रांवर गुरुवारी (दि.६) मोठी गर्दी जमली होती. यात दुसरी लस घेण्यासाठी ...

Crowds for vaccinations made by the elderly | अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी

अबालवृद्धांनी केली लसीकरणासाठी गर्दी

Next
ठळक मुद्देलोहोणेर : लस कमी पडल्याने ज्येष्ठांमध्ये नाराजी

लोहोणेर : कोरोना लस मिळावी म्हणून येथील आरोग्य केंद्रांवर गुरुवारी (दि.६) मोठी गर्दी जमली होती. यात दुसरी लस घेण्यासाठी ज्येष्ठांनी तसेच पहिल्या लसीसाठी अठरा वर्षांवरील तरुणांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

लोहोणेर येथील आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या लसीचा तुटवडा जाणवत होता. नागरिक रोज येथे येऊन चौकशी करून परत जात होते. गुरुवारी (दि.६) सकाळी येथे लस उपलब्ध झाल्याचे वृत्त समजताच लस घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. ४५ दिवसांनंतर दुसरी लस घेण्यासाठी तर काही पहिली लस मिळावी म्हणून आरोग्य केंद्रावर जमले होते.
मुळात लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त २०० डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी १०० डोस देवळा येथे देण्यात आले, तर उर्वरित शंभरच लस शिल्लक राहिल्या, त्यापैकी लोहोणेर येथील फक्त ८० व्यक्तींना लस देण्यात आली. उर्वरित लस खालप, सरस्वतीवाडी, नामदेववाडी, ठेंगोडा येथे पाठविण्यात आल्या. त्यामुळे लोहोणेर येथील काही जेष्ठ नागरिकांना निराश होऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातून परतावे लागले. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत
लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे हमरस्त्याला लागून असून या केंद्रावर सतत कामाचा भार असतो. कोरोना काळात येथील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असतांनाही रात्रंदिवस करून कामाचा भार वाहत आहेत. अशातच कोरोना लस संदर्भात त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. लोहोणेर येथील आरोग्य केंद्रावर कोरोनाची तपासणी करून आपला अहवाल न घेता सुमारे १०० अहवाल अद्याप लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून आहेत.

Web Title: Crowds for vaccinations made by the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.