निर्दयी मातेचा पळ : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर

By admin | Published: March 9, 2017 08:26 PM2017-03-09T20:26:14+5:302017-03-09T20:26:14+5:30

पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर सोडून जिल्हा रुग्णालयातून एका निर्दयी मातेने पळ काढल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.

The cruel mother's move: Five days of child wind | निर्दयी मातेचा पळ : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर

निर्दयी मातेचा पळ : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर

Next



नाशिक : पाच दिवसांचे बाळ वाऱ्यावर सोडून जिल्हा रुग्णालयातून एका निर्दयी मातेने पळ काढल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.
एक अविवाहित गर्भवती महिला प्रसुतीपुर्व वेदना होऊ लागल्याने गेल्या शनिवारी (दि.४) जिल्हा रुग्णालयात पोहचली होती. रुग्णालयातील प्रसुती विभागात डॉक्टरांनी तपासणी करुन तिला प्रसुतीसाठी दाखल करून घेतले. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास त्या महिलेची शस्त्रक्रियेच्या आधारे प्रसुती करण्यात आली. महिलेने एका पुरूष लिंगाच्या बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन दोन किलो असले तरी देखील त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी बाळाला वैद्यकिय उपचारासाठी तत्काळ एनआयसीयु कक्षात हलविले आहे. दरम्यान, या बाळाला जन्म देणाऱ्या अविवाहित महिलेने प्रसुती कक्षात एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे वर्तन सुरू केले. त्यामुळे रुग्णालयातील अन्य रुग्णांनाही त्याचा त्रास होऊ लागला होता. यावेळी डॉक्टरांनी या महिलेची समजूत काढून तिला शांत राहण्याचा सल्ला देत त्या महिलेला प्रसुतीनंतरच्या औषधोपचारही केला. अखेर या महिलेने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास गोंधळ घालून बाळाला मला कुठल्याही परिस्थितीत सोपवा, असा हट्ट धरला; मात्र बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला देता येणार नसल्याचे डॉक्टरांनी या मातेला सांगितले. यानंतर माता रुग्णालयातील कक्षात न थांबता बाळाची कोणतीही काळजी न करता थेट बाहेर पळून गेली. या महिलेचे वय साधारणत: वीस ते बावीस वर्षांच्या मध्ये असून तिने तीचे अर्धवट नाव व पत्ता सांगितल्यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापनही बुचकुळ्यात पडले आहे. महिलेने कोणतेही नातेवाईक किंवा बाळाच्या वडिलाचे नावही सांगितले नाही. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याला माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: The cruel mother's move: Five days of child wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.