पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:16 AM2017-10-24T00:16:47+5:302017-10-24T00:16:47+5:30
नाशिक तालुक्यात यंदा दीडशे टक्के पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना मदत जाहीर करा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसने केली आहे.
नाशिक : नाशिक तालुक्यात यंदा दीडशे टक्के पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना मदत जाहीर करा, अशी मागणी राष्टवादी कॉँग्रेसने केली आहे. राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, यंदा नाशिक तालुक्यात नेहमीपेक्षा दीडपट पाऊस झाला आहे. तालुक्यात द्राक्ष, डाळींब, पेरू, टोमॅटो ही फळबागाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात तसेच कांदा, सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, मका, बाजरी, उडीद, मूग, इतर भाजीपाल्याची पिके घेतली जातात. जूनपासून सलग पाऊस पडतो आहे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा व १ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाने फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बºयाच गावांना शंभर टक्केपर्यंत नुकसान झालेले आहे. शेजारील तालुक्यांमध्ये तहसील व कृषी विभाग पंचनामे करत आहेत, मात्र नाशिक तालुक्यात अजूनही नुकसान पाहणी व पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा व नुकसानभरपाई देण्यात यावी. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही. यावेळी पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, यशवंत ढिकले, ढवळू फसाळे, निवृत्ती महाराज कापसे, विलास कांडेकर, दौलत पाटील, रामदास पिंगळे, साहेबराव पेखळे, गणेश वलवे, दीपक वाघ, रमेश डबाळे आदी उपस्थित होते.
चावडी वाचन नाही
कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावावर चावडी वाचन झालेले नाही. शासनाच्या आकडेमोडीच्या खेळात व शासन निर्णयाच्या घोळात पात्र शेतकºयांच्या यादीचा मेळ बसत नाही. आपत्ग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी वंचित राहू नये याची काळजी शासनाने घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.