कामगारांच्या प्रश्नावर सीटूची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:06 AM2019-05-22T00:06:54+5:302019-05-22T00:07:21+5:30
थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले.
सातपूर : थकीत वेतन, किमान वेतन बोनस व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सीटूच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले.
ज्योती स्ट्रक्चर, कॅपिटल फायबर्स, प्रीमियम टुल्स, लक्ष्मी इंडस्ट्रीज, कॉक्स रिचर्स, केट्रॉस, एसीजी लाइफ, जय इंडस्ट्रीज, जे. एम. इंजिनिअरिंग, नाशिक फोर्ज, अर्थोन बॅटरीज यांसह जिल्ह्यातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर, एस. टी. शिर्के यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सरचिटणीस देवीदास आडोळे, कमिटी सदस्य भिवाजी भावले, संतोष काकडे, कल्पना शिंदे, सिंधू शार्दुल, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, गौतम
कोंगळे, नितीन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.