शेतकऱ्याकडून पोलिसांना काकडीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:09 PM2020-04-20T23:09:23+5:302020-04-20T23:09:39+5:30
कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल होताना पाहूनही शेतकरी बांधवांची उदारता किंचितही कमी झालेली नाही. अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यातक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाउनमध्ये दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे.
नाशिक : कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल होताना पाहूनही शेतकरी बांधवांची उदारता किंचितही कमी झालेली नाही. अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यातक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाउनमध्ये दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे.
पोलिसांनीही या शेतकºयाचे आभार मानले असून, शिंंदे यांच्या या संकल्पनेचे व औदार्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीदेखील कौतुक केले आहे.
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंंदे हे मध्यमवर्गीय युवा शेतकरी आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य शासनाचा कृषी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. देशसेवा करणाºया हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंंदे यांनी एक्सपोर्ट क्वॉलिटीची सुमारे साडेआठशे किलो काकडी बंदोबस्तावर असणाºया सुमारे तीन हजार पोलीसबांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केली.
पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाºयांना नाशिक शहरातील विविध चौकांत चेक पोस्टवर दिवसभराच्या उन्हात बंदोबस्ताला उभे राहावे लागत असल्याने त्यांनी ही मदत केली. शेतकºयांचा कृषिमाल नागरिकांपर्यंत पोहोचावा म्हणून पोलिसांनी विविध प्रकारची मदत केल्याबद्दल आभारी असल्याचे यांनी सांगितले. शेतकºयांनी आपला शेतमाल नष्ट न करता प्रशासनातर्फे चालविल्या जाणाºया निवारागृह, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.