द्राक्षबागेत घेतले काकडीचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:43 PM2020-01-02T22:43:38+5:302020-01-02T22:44:08+5:30
थंडी अन् धुक्यामुळे संकटात आलेल्या द्राक्षबागांमध्ये काकडीचे पीक लावून शेतकºयाला उत्पन्नासाठी आधार मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत : थंडी अन् धुक्यामुळे संकटात आलेल्या द्राक्षबागांमध्ये काकडीचे पीक लावून शेतकºयाला उत्पन्नासाठी आधार मिळाला आहे.
येथून जवळ असलेले नारायण टेंभी व कारसूळ ही गावे संपूर्ण द्राक्षे निर्यातक्षम करणारे गाव. मागील वर्षी जवळपास पाचशे ते सहाशे कंटेनर द्राक्षे निर्यात झाली. या वर्षी शंभरी पण गाठते की नाही असा प्रश्न आहे. जवळपास सत्तर ते ऐंंशी टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे. अशात निर्यातक्षम द्राक्षे पंढरीतील प्रल्हाद दत्तात्रेय गवळी यांची जेमतेम पाच बिगे क्षेत्रात बाग आहे. यावर्षी अडीच बिगे बाग अतिपावसाने आलाच नाही तर अडीच बिगे बाग अत्यंत अल्प आला. यावर्षी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना घोर निराशा झाली. वर्षभरात तीन लाखांपर्यंत खर्च केला, पदरात काही पडणार नसल्याने अखेर पर्याय म्हणून बागेतच काकडी लावली. कुटुंबात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार असताना कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न पडला असताना काकडीचे उत्पन्न सुरू झाले. दोनशे अडीचशे रुपये प्रतिकॅरेट दर मिळत आहे. त्यामुळे अखेर काकडीनेच तात्पुरता का होईना आधार दिला. शासनाकडून मदत जाहीर झाली जरी असली तरी पण मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या काकडीनेच कुटुंबाला तारल्याचे गवळी सांगतात.