गंभीरवाडीत पिण्याचे पाणी गढूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 05:47 PM2019-07-17T17:47:10+5:302019-07-17T17:47:49+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर महामार्गाच्या कामात गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले आहे.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर महामार्गाच्या कामात गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले आहे. यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.
केवळ समृद्धी महामार्गाच्या खोदकाम कामकाजामूळे येथील सार्वजनिक विहिरीवरचा ग्रामस्थांसाठी असलेला रस्ता बंद झाला व सदर खोदलेल्या भागामुळे खड्ड्यातील विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी या ग्रामस्थांना मिळत नाही.
तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या पर्यायी मार्गाने जवळपास चार किलोमीटर दूर अंतरावरून सुविधा केलेले पाणी तीन चार दिवसानंतर येथील वाडीतील पाण्याच्या टाकीत येते परंतु सदर पाण्याची देखील दुरवस्था झालेली असल्याने येथील ग्रामस्थांना ते पाणी सुद्धा गढूळ स्थितीत मिळत आहे.