विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:03 PM2019-12-15T23:03:18+5:302019-12-16T00:29:45+5:30
नांदगाव तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्देशीय सायकल या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
नांदगाव : तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्देशीय सायकल या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
दोन दिवस चालणाऱ्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उपसभापती भाऊसाहेब हिरे यांच्या उपस्थितीत झाला. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या २० व माध्यमिक विभागाच्या ३२ शाळांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या विज्ञानविषयक प्रदर्शन कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य व निपुणतेचे दर्शन उपस्थितांना घडविले.
सौरऊर्जा, धान्य साठवण्याच्या पद्धती, रसायनांचा उपयोग न करता सफाई करण्यासाठी जैविक विघटन होणारा द्रव, अग्निबाण, प्लॅस्टिकचा वापर करून डांबरी रस्ता तयार करणे असे अनेक प्रकल्प यावेळी मांडण्यात आले होते. प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी गर्दी केली होती.
प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे : माध्यमिक गट - आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्टबेसिक आश्रमशाळेतील विशाल गायकवाड याच्या बहुउद्देशीय सायकल या कृतीला प्रथम, मनमाड येथील छत्रे हायस्कूलच्या साहिरा खान हिने सादर केलेल्या सॅटेलाइट लाँच सायकलला द्वितीय, नांदगाव येथील व्ही. जे. हायस्कूलच्या स्नेहा निकम व आर्या शेवलकर यांच्या वॉटर रॉकेट या कृतीला तृतीय, तर मनमाडच्या व्ही. एन. नाईक हायस्कूलच्या ओंकार कापडे व दर्शन आंधळे यांच्या गवत कापणी यंत्राला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. शैक्षणिक साहित्य गटातील कलाकृतीत साकोरा येथील माध्यमिक विद्यालयाचे ए. आर. बोरसे यांचे इ -लर्निंग शैक्षणिक साहित्याला प्रथम, तर मनमाडचे छत्रे हायस्कूलचे गणेश गुजर यांच्या आॅल इन वन किटला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.
शिक्षण अधिकारी नंदा ठोके, के. बी. सोनवणे पी. एस. चिंचोले, प्राचार्य एन. आर. ठोके, प्राचार्य पी. एस. अरु ण पवार,चैत्राम आहिर, सुनील कोठावदे, व्ही. पी. बोरसे, विष्णू कदम कार्यवाह पी.आर. खरोळे, नीलेश इप्पर, ए.एस. शेवाळे, पी.एस. फणसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. एस. बोरसे, श्रीमती ठाकूर यांनी केले. संजय बच्छाव यांनी आभार मानले.
तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेचा निकाल
प्राथमिक गटात कमलाबाई कासलीवाल विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी पाटील व दिव्या घोटेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीला या कलाकृतीला प्रथम, साकोरा येथील माध्यमिक विद्यालयातील शंतनू मवाळ व समीर शेवाळे यांच्या रिमोट कंट्रोल सिस्टीमला द्वितीय, मनमाड येथील एचएके विद्यालयातील शेख उसैद वाजीद व अल्तमश शेख यांच्या स्वच्छतेकडून आरोग्याकडे या कलाकृतीला तृतीय, तर मनमाड येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचा ऋषिकेश गवळी याच्या फरशी साफ करण्याचे यंत्र या कलाकृतीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.