सुशिक्षित होताना सांस्कृ तिक वारसा जपावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:02 PM2017-08-20T22:02:34+5:302017-08-21T00:25:31+5:30
सुशिक्षित होताना सांस्कृतिक वारसा जपावा तसेच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यात मविप्र संस्था अग्रेसर असून, या संस्थेने चांगले विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविले असल्याचे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या मविप्र संस्थेच्या समाज दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
निंबाळकर : समाज दिन कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक सन्मानित
नाशिक : सुशिक्षित होताना सांस्कृतिक वारसा जपावा तसेच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यात मविप्र संस्था अग्रेसर असून, या संस्थेने चांगले विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविले असल्याचे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या मविप्र संस्थेच्या समाज दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निंबाळकर यांनी, मविप्र ही संस्था बहुजन समाजाच्या शिक्षणाचा वसा घेतलेली उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची संस्था असल्याचे सांगताना राजाश्रय व लोकाश्रयामुळे संस्थेची प्रगती झालेली असून, मविप्रच्या विद्यार्थ्यांनी आज जगभर आपली ख्याती निर्माण केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांनी संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, उत्तम भालेराव, प्रल्हाद गडाख, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, रायभान काळे, हेमंत वाजे, दत्तात्रय पाटील, रामचंद्रबापू पाटील, श्रीराम शेटे ,रवींद्र देवरे, प्रताप मोरे आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार आणि प्रा. अशोक सोनवणे, तर आभार चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले.