द्राक्षाला फाटा देत ड्रॅगन फुडची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:48 PM2020-09-12T21:48:35+5:302020-09-13T00:06:08+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुका म्हणजे द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेला तालुका मात्र, तालुक्यातील द्राक्ष पिकाला फाटा देत ड्रायफूडची लागवड करण्यात आली असून कमी पावसात येणारे डॅÑगन फूडची लागवड करण्याचा प्रयोग कोशिंबा येथील रवींद्र पवार यांनी केला आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुका म्हणजे द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेला तालुका मात्र, तालुक्यातील द्राक्ष पिकाला फाटा देत ड्रायफूडची लागवड करण्यात आली असून कमी पावसात येणारे डॅÑगन फूडची लागवड करण्याचा प्रयोग कोशिंबा येथील रवींद्र पवार यांनी केला आहे.
तालुक्यातील पाश्चिम पटयातील कोशिंबा व दहीवी शिवारातील पवार या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकाने आपल्या शेतात डॅÑगन फुडची लागवड करु न नविन पिक तालुक्यात घेतले. तालुक्यात पूर्वी भात नागली, वरी, भुईमुग, उडीद, मुग आदींसारखे पिके घेतली जात होती. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचे स्त्रोत वाढल्यामुळे शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळाले. त्याचे लागवड क्षेत्रही वाढले. आता दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, डांळीब, पेरू ही पिके शेतकरी घेत होतात. परंतु पांडाणे येथील सोमनाथ काळोगे यांनी सफरचंदाचेही पिक घेतले होते . जर आपल्या दिंडोरी तालुक्यात काश्मिरी सफरचंदचे पिक येवू शकते तर ड्रॅगन फुडचे पिकही घेता येईल, असा आशावाद व्यक्त करत रवींद्र पवार यांनी हा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यासाठी लागणारी रोपे पुणे जिल्हयातील चाकण येथून आणून दोन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फुडची लागवड केली. बाग सेंद्रीय असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती, सर्दी खोकला या व्याधींवर ड्रॅगन फुड उपयुक्त असल्याचे पवार यांनी सांगीतले. उत्पादनाचा एकरी खर्च दोन लाख रु पये झाला असून बाजारात ड्रॅगन फुडची मागणी असल्यामुळे प्रतिनग पन्नास रु पयापर्यंत विक्र ी होत असल्याचेही रवींद्र पवार यांनी सांगीतले.