आदिवासी एकता परिषदेतर्फे सांस्कृतिक संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:23 PM2018-01-18T15:23:21+5:302018-01-18T15:23:31+5:30
सुरगाणा-आखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित २५ वा सांस्कृतिक सोहळा नुकताच गुजरातमधील राजपिंपला येथे उत्साहात पार पडला. यात ईगतपुरी, धुळे, नंदुरबार येथील कलापथकांनी नृत्य सादर केले. राजपिपला येथील सोहळ्याला भारतातील कानाकोपर्यातून पंधरा ते विस राज्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी कला पथकांनी कला सादर करून आपल्या भागातील कला, संस्कृती, परंपरा याचे दर्शन घडविले. भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक कला पाहून उपस्थितांच्या डोळयाची पारणे फेडली. गेले अनेक दिवस या कार्यक्र माची तयारी सुरु होती. या सांस्कृतिक संमेलनास लाखोंच्या संख्येने आदिवासी पर्यटकांनी भेट देऊन प्रतिसाद दिला.या करीता भव्य शामियाना मंडप उभारण्यात आला होता. या प्रसंगी झारखंड, नागालँड, आसाम, महाराष्ट्र,नागालैंड, लद्दाख,दादरा नगर हवेली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश या राज्यातील कला पथकांनी उपस्थिति लावून आपल्या भागातील लोक कला संस्कृतीचे दर्शन घडविले. नाशिक जिल्ह्यÞातील आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल, आदिवासी युवा संकल्प संघटनेचे अध्यक्ष चेतन खंबायत, राम चौरे, कृष्णा गावित, डॉ.हिरामण गावित,जयराम गावित, जयवंत गारे,शुभम राऊत, कवि रमेश भोये, किसन ठाकरे,डॉ.मुरलीधर वाघेरे, विजय घुटे, ग्रामसेवक पवार, सुरगाणा येथील रतन चौधरी, आर.जी. पवार, तुकाराम भोये, राजाराम राऊत, पंडित गायवन, माधव झरिवाळ उंबरठाण येथील राजू चौधरी, माधव चौधरी, सिताराम कडवा, केशव महाले, शंकर बागुल आदि संमेलनास उपस्थित होते.