अंदरसूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:55 PM2019-12-29T22:55:07+5:302019-12-29T22:55:36+5:30
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम, सेमी इंग्लिश व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. दोनदिवसीय कार्यक्र माचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अध्यक्षस्थानी सरपंच विनीता सोनवणे होत्या.
अंदरसूल : अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम, सेमी इंग्लिश व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. दोनदिवसीय कार्यक्र माचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अध्यक्षस्थानी सरपंच विनीता सोनवणे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री अर्चना निपाणकर, तहसीलदार रोहिदास वारूळे, येवल्याचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, संपत शिंदे, बाळासाहेब लोखंडे, गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे, विस्तार अधिकारी अनिल मारवाडी, केंद्रप्रमुख कैलास रोडे, प्रदीप सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गोटू मांजरे आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय सुनीता वडे यांनी करून दिला. संकुलाच्या वर्षभरातील उपक्र मांचा आढावा प्राचार्य अल्ताफखान यांनी सादर केला. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते रंगोत्सव स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक अजहर खतीब, प्राचार्य अल्ताफखान यांचा सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस सुभाष सोनवणे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, संचालक विलास गाडे, मकरंद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, अमोल सोनवणे, रामनाथ एंडाईत, काशीनाथ एंडाईत, मयूर सोनवणे, सचिन बागुल, विजय सोनवणे, संदीप वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा बागुल, अर्चना सोनवणे, मुख्याध्यापक जयश्री परदेशी, प्राचार्य सचिन सोनवणे, जालिंदर म्हस्के, माधुरी माळी, गणेश सोनवणे, दीपक खैरनार, सागर गाडेकर, शिवाजी झांबरे, सुनील सपकाळ, शिवा शिरसाठ, प्रशांत बिवाल आदी उपस्थित होते.
अभिनेत्री अर्चना निपाणकर यांनी, मराठी सिरिअलपासून केलेली सुरु वात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील पानीपत सिनेमापर्यंत केलेल्या अभिनयातील रोचक प्रसंग व अडथळे कथन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी चित्रपट गीतांवर नृत्य सादर केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे नाटक, लेजीम नृत्य सादर केले.