नवजीवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:13 PM2019-12-27T22:13:22+5:302019-12-27T22:14:31+5:30
नवजीवन डे स्कूल सिन्नर येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म पार पडला.यावेळी मुला मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास काळे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम एखंडे, आदित्य तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, किरण खाडे, सुभाष देशमुख, विजया देशमुख, विजय काळे, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.
सिन्नर : नवजीवन डे स्कूल सिन्नर येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म पार पडला.यावेळी मुला मुलींनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुहास काळे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम एखंडे, आदित्य तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे, किरण खाडे, सुभाष देशमुख, विजया देशमुख, विजय काळे, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.
दैनंदिन अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतांना मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज असल्याचे काळे यांनी सांगितले. सुदाम एखंडे यांनी मनोरंजनात्मक शिक्षणा बरोबर शिस्तीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनया बद्दल मुलांना मार्गदर्शन करत सूत्रसंचालनाचे बारकावे आदित्य तुपे यांनी सांगितले. शिक्षिका गौरी परदेशी यांनी प्रास्ताविक सादर केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्री गणेश स्तवन, कोळीगीते, हिंदी आणि मराठी लोकगीत व नृत्य सादर केले. विशेषत: संस्कृती काळे व दहावीच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचारावर आधारित सादर केलेली नाटिका उपस्थितांना आकर्षित करणारी ठरली. गत शैक्षणकि वर्षात
विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी नवजीवन संस्थेचे महेंद्र विंचूरकर, डिंपल पाटील, अरूण भालेराव, प्रा.बी.बी. पाटील अनिता सूर्यवंशी, वृषाली लोंढे,योगिता भाटजीरे, नरेंद्र वाघ, प्रल्हाद देशमुख, बाळासाहेब सुर्वे व पालकांसह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.