संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात होणार सर्व कलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:30 PM2021-02-24T20:30:50+5:302021-02-25T01:26:45+5:30

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत.

The cultural program of the meeting will include all the arts | संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात होणार सर्व कलांचा समावेश

संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात होणार सर्व कलांचा समावेश

Next
ठळक मुद्देनृत्य, नाट्य, लोककला, संगीत या सर्व कलांचा तसेच स्थानिक कलांचा व्यापक समावेश हवा,

नाशिक : साहित्य संमेलनात अखेरच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत.                   
त्यात नृत्य, नाट्य, लोककला, संगीत या सर्व कलांचा तसेच स्थानिक कलांचा व्यापक समावेश हवा, त्यामुळे कार्यक्रम दर्जेदार व सर्वसमावेशक तसेच रंजक होईल अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाची आखणी सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या बैठकीत करण्यात आली.
साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांना खूप महत्त्व असते.

या बैठकीला समिती प्रमुख विनोद राठोड यांच्यासह अनेक कलाकार सभासद उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम निवड, कालावधी, व्यावसायिक व स्थानिक कलाकार व कार्यक्रम निवड व कलाकारांचे मानधन वगैरे विषयांवर चर्चा झाली. कलाकारांच्या निवास, भोजन व्यवस्था, व्यासपीठ व्यवस्था, ध्वनी व्यवस्था आदी बाबींवर चर्चा झाली.

सांस्कृतिक कार्यक्रम समितीतर्फे एखादा कार्यक्रम करायचा झाल्यास त्याचे स्वरूप, सराव आणि रंगीत तालीम यांचा आराखडा करण्याची आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनविण्याची सूचना करण्यात आली. यावेळी संमेलनाचे सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक व व्यावसायिक असे २ भाग आहेत. त्या दृष्टीने रूपरेषा आखावी असेही त्यांनी सांगितले.

सतीश वाणी यांनी नाशिकची ओळख होईल व महत्त्व पटेल असा प्रयोग सादर करावा अशी सूचना केली. रवी जन्नावार यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी प्रियांका बोराडे, प्रज्ञा कुलकर्णी, साक्षी बोराडे, जयंत ठोमरे, वृषाली भट, डॉ. शैलेंद्र गायकवाड उपस्थित होते.
लोगो
 

Web Title: The cultural program of the meeting will include all the arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.