नांदुर्डी शाळेत सांस्कृतिक कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:22 PM2020-02-24T23:22:45+5:302020-02-25T00:24:04+5:30
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पं. स. सभापती अनसूया जगताप, उपसभापती शिवा सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पं. स. सभापती अनसूया जगताप, उपसभापती शिवा सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी वैविध्यपूर्ण कलागुणांनी संपन्न असतात. त्यांच्यातील उपजत कलागुणांना आकार देऊन सर्वोत्तम व्यासपीठ देण्याचे काम जि.प. शाळेतील शिक्षक मेहनतीने या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत जि.प. शाळा गुणवत्तेत अधिक सरस ठरत आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापक रत्नाकर दवंगे, सरपंच ज्ञानेश्वर पवार, उपसरपंच जितेश निकम, तंटामुक्त समिती अध्यक्ष रोहिदास फुगट, सोसायटी चेअरमन गणपत ठोमसे, अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप आहिरे, कचू खापरे, अंबादास खैरे आदी उपस्थित होते.