विंचूर विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:36 PM2020-01-02T23:36:38+5:302020-01-02T23:37:02+5:30
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्तार अधिकारी वसंत गायकवाड उपस्थित होते.
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्तार अधिकारी वसंत गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी केले. प्रमुख अतिथी रंजवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सायबर क्र ाइम व मोबाइल यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर गीते, कोळीगीते, शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव, शिवराज्याभिषेक, सर्वधर्मसमभाव, आई-वडिलांचे महत्त्व, पोवाडा, गायन, नाटिका, नृत्याविष्कार सादर केले. परीक्षक म्हणून वैशाली दिघे व जितेंद्र आहिरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी विंचूरच्या सरपंच वंदना कानडे, सदस्य भास्करराव परदेशी, नंदिनी क्षीरसागर, सल्लागार समिती सदस्य सुनील मालपाणी, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पी.के. जेऊघाले, विनायक जेऊघाले, आबा दरेकर, शंकर दरेकर, अशोक दरेकर, प्रवीण ढवण, कैलास पाटील, अण्णासाहेब आव्हाड, अरु णा राऊत, मंदाकिनी आहिरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्या कुलकर्णी, राजेंद्र चांदे, बालिका नागणे यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभ भुजबळ नॉलेज सिटीच्या कार्यकारी अधिकारी शेफाली भुजबळ, नवनियुक्त न्यायधीश रेणुका राहतेकर, सामाजिक कार्यकर्त्या वेदिका होळकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्र मातील गुणवंत तसेच विविध परीक्षांमधील यशस्वीतांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.