सांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:27 AM2018-03-11T00:27:44+5:302018-03-11T00:27:44+5:30
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड परिसरातील सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड परिसरातील सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच अनेक क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
फॅमिली फिजिशियन असोसिएशन व नाशिक फर्टिलिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नलिनी बागुल यांनी वंध्यत्व निवारण, चिकित्सा व उपचार या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील उपस्थित होत्या. यावेळी ६५ महिला डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. स्मिता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मंजूषा दराडे यांनी केले. डॉ. शीतल सुरजुसे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. प्रमोद अहेर, डॉ. अभय शुक्ल, डॉ. विभुती रावते, डॉ. दर्शना शेलार, डॉ. प्रतिभा औंधकर आदी उपस्थित होते.
पेठे विद्यालयात महिला दिन उत्साहात पार पडला. प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते सर्व महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. निनाद बोरसे व सुमित गायकवाड या विद्यार्थ्यांनी महिला दिनाची माहिती सांगितली. शिक्षक संतोष देवांग यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी सांगून यशस्वी पुरुषांमागील स्त्रियांची भूमिका विविध उदाहरणे देत स्पष्ट केली. याप्रसंगी मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षिका कुंदा जोशी, शिक्षक प्रतिनिधी शशांक मदाने, सर्व महिला शिक्षिका, सर्व विद्यार्थिनी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिलीप बोरसे आदी उपस्थित होते.
सुनहरी यादे कार्यक्रम
महिला दिनानिमित्ताने बागेश्री व सामाजिक अभिसरण या संस्थेतर्फे महिला बंदीवानांसाठी सुनहरी यादे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायिका रुचा झेंडे हिने गायिलेल्या ‘तू बुद्धी दे..., तू तेज दे’ या प्रार्थना गीताने मैफलीचा प्रारंभ झाले. त्यानंतर मीनाक्षी वाळवेकर यांनी मराठी हिंदी गाणी सादर केली. गायिका मेनका सुगंधी, श्रेया गायकवाड यांनी सहगायनाची साथ केली. विशेष म्हणजे महिला बंदीवानांनी या कार्यक्रमात अभंग म्हटली. विविध गीतांना दीपक दीक्षित (संवादिनी), चारुदत्त दीक्षित (तबला), रुचा झेंडे (तालवाद्ये) यांनी साथ संगत केली. याप्रसंगी महिला तुरुंगाधिकारी नेहा गुजराथी, पूजा जाधव, कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, दादाजी बागुल, सुनीता कोकळेश्वर, तुरुंगाधिकारी पल्लवी कदम, डॉ. कवडे, डॉ. श्रीमती पठाण उपस्थित होते. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले.
मखमलाबाद नाक्यावरील पंचवटी विभागीय कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या हस्ते केक कापण्यात येऊन महिलांना कर्मचाºयांना शुभेच्छा व गुलाब पुष्प देण्यात आले. वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून ज्ञानज्योती संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव, तुषार महाजन, राजेश बनकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ. अनिता दराडे, डॉ. माधवी गोरे आदी उपस्थित होते. यावेळी निव्होकेअर फार्माचे सहकार्य लाभले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. प्रणिता गुजराथी यांनी केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.