सांस्कृतिक आतंकवाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 03:29 PM2020-07-17T15:29:02+5:302020-07-17T15:30:46+5:30
आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.
आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत.
मुळात श्रीराम म्हणजे भारताचा आत्मा!
तुलसी रामायण --
बंदउँ अवध पुरी अति पाविन। सरजू सरि कलि कलुष नसाविन॥
प्रनवउँ पुर नर नारि बहोरी। ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी॥1॥
भावार्थ:-
मी अति पवित्र श्री अयोध्यापुरी आणि कालियुगाच्या पापांचा नाश करणारी शरयू नदीला मी वंदन करतो,आण िआयोध्यापुरीतील पुरु ष व स्त्रियांना वंदन करतो ज्यांच्यावर श्रीरामाची अतीव ममता आहे .
त्यावरच आघात करण्याचा अत्यंत लांच्छनास्पद प्रयत्न नेपाळचे कोली करत आहेत. हा चीनची सगळी धोरणं राबवायचा फाजील प्रयत्न आहे.पण उगीच काड्या घालून वाद निर्माण करायचे आणि मूळ प्रश्नावरून लक्ष वळवायचे काम चालू आहे. श्रीराम भारताचा! भारत श्रीरामाचा! यात काहीच दुमत नाही. रामायण, तुलसी रामायण, आध्यात्म रामायण, आनंद रामायण हे सर्व ग्रंथ ह्या शर्मा ओली ह्यांना नावाने तरी माहीत आहेत का?. हे सर्व ग्रंथ रामायणाची पर्यायाने श्रीराम आणि भरतकुळाची इत्थंभूत माहिती देतात.
श्रीरामाचा जन्म शरयू तीरावर, शरयू नदी कुठे, सर्व ग्रंथ ज्या गोष्टीची साक्ष देतात ती शरयू माता अयोध्येत, मग पंतप्रधान कोलीनी कुठल्या आधारावर श्री राम नेपाळी होते असं विधान केलं ते त्या पशुपतींनाथाला ठाऊक. मुळात श्री. ओली हे कम्युनिस्ट त्यांचा मुळात राजे राजघराणे ह्यांचा संबंधच नाही,आणि ते रामायणासारख्या विषयावर बोलणार हेच पटत नाही. रामायणामध्ये उल्लेखलेले श्रीराम जन्माचे स्थान मुळात आजच्या उत्तरप्रदेशातील अयोध्येतच आहे, असा पुरावा देणारे लाखोंनी हास्तलिखितांचे आधार - पुरावे आपण सगळे देऊ शकतो. मुळात श्रीराम जन्मासबंधीत झालेले पुत्रकामेष्टी याग ज्या स्थानी झाला त्या अग्निहोत्राशी संबधीत यागाची जागा त्यांच्या महालाजवळील होती, हे रामायाणामध्ये उल्लेख आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यानंतर तो नैवेद्य-पायस भक्षण करण्यासंदर्भात जी कथा येते त्यातही निसर्ग आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली ती अयोध्याच आहे. तुलसी रामायणामध्येही परिसर वर्णन आले आहे. पायस प्राशनानंतर श्रीराम जन्म आण िजन्मानंतरचा पूर्ण काळ हा वरील रामायणाच्या सर्वच ग्रंथात आला आहे, रामायणाचा संपूर्ण काळ ते मिथिला नरेशाची मुलगी सीता ह्यांचा विवाह ज्या वेळी झाला त्यावेळचा परिसराचाही उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे, पण एक अगदी पक्के सांगता येते की यात कोठेही नेपाळ मधील कुठल्याही परिसराचा उल्लेख नाही. या वादात पडण्यापेक्षा नेपाळी पंतप्रधानाला पुराव्यानिशी बोलण्याची विनंती करावी.
दिनेश वैद्य, संचालक, व्यास रिसर्च सेंटर