चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:58 AM2018-12-13T00:58:01+5:302018-12-13T00:58:37+5:30

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले ...

 Culture will remain with good culture: Ramkrishna Maharaj Lahwitkar | चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

चांगल्या संस्कारातून संस्कृती टिकणार :  रामकृष्ण महाराज लहवितकर

googlenewsNext

आडगाव : देशात व्यभिचार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे देशाला सुसंस्कृतबरोबर सुसंस्कारित पिढीची गरज आहे. नव्या पिढीला संस्कार मिळाले तरच भारतीय संस्कृती टिकणार आहे. चांगल्या संस्कारातूनच देशाची संस्कृती टिकणार आहे, असे विचार आचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी मांडले. मानूर येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. नगरसेवक उद्धव निमसे अध्यक्षस्थानी होते.
मानूर येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेवक शीतल माळोदे, माजी नगरसेवक शिवाजी निमसे, नांदूर-मानूर सोसायटीचे सभापती सोमनाथ हांबरे, साहेबराव गायकवाड, राजू लवटे, भाऊसाहेब निमसे, अ‍ॅड. नितीन माळोदे, सुरेश निमसे, सुनील आडके आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव निमसे, साहेबराव गायकवाड, खासदार गोडसे, आमदार सानप, शिवाजी चुंभळे, सुनील आडके, संभाजी मोरुस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय माळोदे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वसंत श्री तुकोबाराय सेवाभावी टस्टचे अध्यक्ष प्रभाकर माळोदे यांनी आभार मानले.
गावोगावी हनुमानाच्या मंदिराची उभारणी
डॉ. रामकृष्ण लहवितकर म्हणाले, हनुमान हे शक्ती, ज्ञान, बुद्धी, सदाचार यांचे प्रतीक आहे. म्हणूनच गावोगावी हनुमानाच्या मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिराच्या माध्यमातून मानूरगावाला भक्तीचे संस्कार मिळाले आहे. गोदाकाठची जी गावे आहेत, त्यांचा रामायण काळात उल्लेख आढळतो. अशा प्रकारचे येथील भूमीचे वैशिष्ट्य आहे. येथे जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. नवीन मंदिर उभे करणे एकवेळ सोपे काम आहे. मात्र, जुन्या मंदिराचे काम करणे अवघड असते.

Web Title:  Culture will remain with good culture: Ramkrishna Maharaj Lahwitkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.