नाशिक शहरात जमावबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:00 PM2021-03-10T23:00:56+5:302021-03-11T01:31:43+5:30
नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आयुक्तालय क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम-१४४ नुसार मनाई आदेश लागू करत असल्याची अधिसूचना बुधवारी (दि.१०) सकाळी जारी केली. या अधिसूचनेची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत ही अधिसूचना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले आहे.

शहरात मार्च महिना उजाडताच कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झपाट्याने होताना दिसत असल्याने, पाण्डेय यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयुक्तालय हद्दीत बुधवारी मध्यरात्री १ वाजेपासून ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४नुसार विविध प्रकारे मनाई आदेश राहणार आहे. या आदेशानुसार शहरात वावरताना नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने खबरदारी घेत वर्तणूक करणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क योग्यरीत्या लावणे बंधनकारक आहे, तसेच उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, धूम्रपान करण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे मेळावे, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, उरुस, मनोरंजन कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सर्व आठवडे बाजार भरविण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत, अंत्यविधीसाठी २० लोकांना एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.