संचारबंदी आदेश लागू : शहरात धुलीवंदन, वीर मिरवणुकांसह रहाड रंगोत्सवावरही बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 07:31 PM2021-03-28T19:31:04+5:302021-03-28T19:34:20+5:30

धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

Curfew order imposed: Ban on Dhulivandan, Veer processions and Rahad Rangotsava in the city | संचारबंदी आदेश लागू : शहरात धुलीवंदन, वीर मिरवणुकांसह रहाड रंगोत्सवावरही बंदी

संचारबंदी आदेश लागू : शहरात धुलीवंदन, वीर मिरवणुकांसह रहाड रंगोत्सवावरही बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांकडून मनाई आदेश काढण्यात आले आहेआपत्ती व्यवस्थापन व साथरोग कायद्याची अंमलबजावणी

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुठल्याहीप्रकारे गर्दी होणार नाही, यासाठी सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सण, उत्सवांमधील पारंपरिक प्रथा सार्वजनिकरित्या पार पडणार नसल्याचे आदेश काढण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाने होळी, धुलीवंदन तसेच नाशिकमधील वीर मिरवणुकांवर बंदी घातली आहे. याचप्रमाणे पंचवटी, जुने नाशिक परिसरात होणाऱ्या रहाड रंगपंचमीवरही बंदी घालण्यात आली असून सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी याप्रकरणी अधिसूचना रविवारी (दि.२८) जारी केली आहे. सोमवारी (दि. २९) आणि शुक्रवारी (दि. २ एप्रिल) रोजी हे निर्बंध लागू असतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

धुलिवंदन, वीर मिरवणूक, रंगपंचमी साजरी केली जाते; मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही या उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. यामुळे पंचवटी, रामकुंड व गोदाघाट परिसरात गर्दी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन व साथरोग कायद्याची अंमलबजावणी करत प्रशासनाने धुलिवंदन, वीर मिरवणूका आणि रंगपंचमीवर देखील मर्यादा घातली आहे. सोमवारी धुलिवंदन आणि वीर मिरवणूक असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता याठिकाणी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून मनाई आदेश काढण्यात आले आहे. तसेच वीर मिरवणूकीकरिता भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून मोदकेश्वर गणपतीकडून व गाडगे महाराज पुलाकडून गोदाघाटकडे येणारे मार्ग आणि सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून भांडीबाजाराकडून रामसेतू पुलाकडून येणारा मार्ग, मालेगाव स्टॅड, सरदार चौक, शनि चौक, गणेशवाडी, अमरधामकडून येणारा मार्गावरुन मिरवणूका, भाविक व वाहनांना रामकुंड व गोदाघाट परिसरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली अशा तीनही पोलीस ठाण्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Curfew order imposed: Ban on Dhulivandan, Veer processions and Rahad Rangotsava in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.