संचारबंदीचे उल्लंघन; ४७ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:10 PM2020-06-22T23:10:41+5:302020-06-22T23:11:22+5:30
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक शहरात २२ मार्च ते २२ जून या कालावीत एकूण ८ हजार ७८० गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असतानाही त्यांचे गांभीर्य न घेता ज्या नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला नाही अशा २४ इसमांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत तीन हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे, तर शहर वाहतूक शाखेतर्फे २५ मार्च ते २१ या कालावधीत मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत कारवाई एकूण ६१ लाख २ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. त्यापैकी ८ लाख ६६ हजार ३०० रुपये वसूल करण्यात आला असून, ५२ लाख ३६ हजार दोनशे रुपये दंडवसूल करणे बाकी असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. तरीदेखील काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार शहरात १ हजार ५८७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले
आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, कोरोना बरा होण्याचे चुकीचे उपाय यांसह विविध अफवा सोशल मीडियावर पसरविल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम सर्वाधिक २९५ वाहने नाशिकरोड, त्याखालोखाल २९२ वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉण्डद्वारे परत देण्यास सुरुवात केली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
परिमंडळ एकमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच हजार २४९ आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन हजार १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात सर्वाधिक १ हजार ३१३ गुन्हे, तर त्याखालोखाल १ हजार २८० गुन्हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहेत अशा नागरिकांची २ हजार २१३ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.