संचारबंदीचे उल्लंघन; २१६ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:36 PM2020-04-26T23:36:04+5:302020-04-26T23:36:26+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºया सिन्नर तालुक्यातील २१६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच १२८ दुचाकी व १८ चारचाकी सिन्नर, एमआयडीसी व वावी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाचे आदेश मोडणाºया सिन्नरच्या चार किराणा दुकानदारांसह एका सलून व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Curfew violation; Crimes against 216 persons | संचारबंदीचे उल्लंघन; २१६ जणांवर गुन्हे

सिन्नर पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या चारचाकी जप्त केल्या आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देचार किराणा दुकानदारांसह सलून व्यावसायिकाचा समावेश

शैलेश कर्पे ।
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºया सिन्नर तालुक्यातील २१६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच १२८ दुचाकी व १८ चारचाकी सिन्नर, एमआयडीसी व वावी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आल्या आहेत. शासनाचे आदेश मोडणाºया सिन्नरच्या चार किराणा दुकानदारांसह एका सलून व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा प्रकोप जसजसा वाढतो आहे, तसतशी धडकी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना भरत आहे. तरीदेखील कर्तव्य म्हणून देशहितासाठी आपली जबाबदारी पार पाडण्यास ते सज्ज आहेत. अशात लॉकडाउन तोडणाऱ्यांना आवरण्याची कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र आहे. देशावर कोरोनाचे संकट असताना विविध कारणे सांगून घराबाहेर पडणाºया विरोधात सिन्नर तालुक्यातील सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम उघडली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे, वावीचे सहायक निरीक्षक रणजित गलांडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १२८ दुचाकी व १८ चारचाकी जप्त करूनही विविध कारणे सांगून घराबाहेर पडणाºयांचे प्रमाण कमी होत नसल्याचेही दिसून येत आहे.
लॉकडाउनच्या काळात सिन्नर पोलीस ठाण्यात १०५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७५ दुचाकी व चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वावी पोलीस ठाण्यात ८१ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४४ दुचाकी तर ८ चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० गुन्हे नोंदविण्यात आले असून ८ दुचाकी, व १ चारचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सिन्नरला गेल्या ८-१० दिवसांत पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी व कार लावण्यासाठी पोलीस ठाण्याजवळील जागाही आता अपूरी पडू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसणे हाच एकमेव उपाय असून त्याबाबत देशभर जनजागृती करण्यात येत आहे.
नगर परिषद, ग्रामपंचायतस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यात सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर आहे. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये यासाठी २४ तास पोलीस फिरत आहेत. प्रत्येकाची समजूत घालत त्यांना घरातच बसण्यासाठी आग्रह करत आहेत. सारखे घराबाहेर भटकणाºयांना कधी उठा-बशांची शिक्षा तर कधी काठ्यांचा प्रसादही देत आहेत. दुचाकीस्वाराच्या मागे पोलीस बसून थेट त्यांची वरात पोलीस ठाण्यात नेत आहेत. तेथे संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करून मोटारसायकल जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्व जप्त केलेल्या मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला लावण्यात येत असून, या मोटारसायकली लावण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. सिन्नर शहरात ९ कार चालकांविरोधातही अशीच कारवाई करण्यात आली असून, या कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटारसायकलचालकांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले असून, या सर्व मोटारसायकल्स सांभाळण्याची वेळ पोलिसांवरच आली आहे.
च्जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने दुपारी ४ वाजेनंतर किराणा दुकान बंद ठेवणे गरजेचे असताना चार किराणा दुकानदार दुपारी ४ वाजेनंतर दुकान उघडे ठेवून गिºहाईक करीत असल्याने चार किराणा दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक सलून दुकानदार गिºहाईक घरी बोलावून कटिंग व दाढी करताना मिळून आल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Curfew violation; Crimes against 216 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.