राष्टवादीच्या नव्या प्रभारीबद्दल उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:21 AM2018-05-01T01:21:43+5:302018-05-01T01:21:43+5:30
राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नवीन पक्ष प्रभारी कोण? याबद्दल राष्टवादीत उत्सुकता निर्माण झाली असून, दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीच्या नेतृत्वात झालेल्या फेरबदलात पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पक्षाची धुरा तरुणांच्या हाती सोपविण्याचे संकेत दिल्यामुळे राष्टवादीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी सुनील वाजे, प्रकाश वडजे या इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
नाशिक : राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नवीन पक्ष प्रभारी कोण? याबद्दल राष्टÑवादीत उत्सुकता निर्माण झाली असून, दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीच्या नेतृत्वात झालेल्या फेरबदलात पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पक्षाची धुरा तरुणांच्या हाती सोपविण्याचे संकेत दिल्यामुळे राष्टवादीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी सुनील वाजे, प्रकाश वडजे या इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राष्टवादीच्या नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनेच्या काळाचा उल्लेख केला. शरद पवार यांनी पक्ष स्थापन करताना तरुणांना पक्ष संघटनेत व सत्तेत अधिकाधिक संधी दिल्याने पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला होता याची आठवण अजित पवार यांनी करून दिली, त्याचाच धागा पकडून खुद्द शरद पवार यांनीदेखील देशापुढील प्रश्न व समस्या पाहता पक्ष संघटनेची सूत्रे आगामी काळात तरुणांच्या हाती देण्याची गरज बोलून दाखविली. पक्ष हा वीस वर्षांच्या तरुणासारखा असावा त्यासाठी पक्षाच्या वाटचालीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या, परंतु सूत्रे मात्र तरुणांच्या हाती सोपवा, नवीन नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील पक्षाच्या रचनेत तरुणांना संधी देण्याचे सुतोवाच केले आहे. पक्षाच्या नेत्यांचा तरुण नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांचा विचार करता होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी श्रीराम शेटे, रवींद्र पगार, प्रकाश वडजे, सुुनील वाजे, सचिन पिंगळे आदींनी पक्षाकडे इच्छा प्रदर्शित केली असून, प्रदेशाध्यक्षांची निवडीचा सोपस्कार पार पडल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रविवारी सुनील वाजे यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन आपली इच्छा बोलून दाखविली. राष्टवादीचे नवीन जिल्हा प्रभारी कोण? याविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, आमदार जितेंद्र आव्हाड, महेश तपासे यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. आव्हाड यांचे स्वत: नाशिक जिल्ह्याशी जवळचे संबंध असून, यापूर्वी त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रभारी पद येऊ शकते, तर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे.