जिज्ञासा जोपासणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन होय : दिलीप देवबागकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:18 AM2018-10-09T01:18:39+5:302018-10-09T01:19:34+5:30
कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते.
नाशिक : कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते. पंचवटीतील पेठरोड येथील उन्नती विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या बालविज्ञान केंद्र आणि बाल वाचनालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो विभागाच्या प्रमुख दीप्ती देवबागकर, इंडिया चाप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरूडे, तपारिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन, संस्थेचे पदाधिकारी बापू बागड, सुभाष मुसळे, रमाकांत अलई, रवि अमृतकर, आबा पाटकर, सुभाष कुंभारे, विस्तार अधिकारी नेहा शिरूडे, वास्तुविशारद स्मिता वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे यांनी बालविज्ञान केंद्राचे उद्देश सांगताना सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी भावना असल्याचे सांगून या केंद्रामुळे अशा मुलांमध्ये स्फूर्ती निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी शास्त्रज्ञ शिरूडे, दीप्ती देवबागकर, शिवरामकृष्णन, अॅड. मनिष अमृतकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष मुसळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन जितेंद्र सोनजे व प्रमोद कोठावदे यांनी केले. कार्यक्रमास सुधाकर बागड, चंदन मेखे, दिलीप पाटकर, विलास कोठावणे, सुभाष कुंभारे, रामदास अमृतकर, बापूराव शिनकर, रमाकांत अलई, सतीश सोनजे, संजय घरटे, आदी उपस्थित होते.
शिकण्याची जिद्द महत्त्वाची
यावेळी देवबागकर म्हणाले, कोणतेही शिक्षण आणि माध्यम हे बुद्धिमत्तेच्या आड येत नाही. मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील हे मोठ्या पदापर्यंत पोहचू शकतात. परंतु त्यांच्यात शिकण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट असाध्य नाही, फक्त ते साध्य करण्याची जिद्द बाळगली तर काहीही शिकता येऊ शकते, असेही देवबागकर म्हणाले.