ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 06:18 PM2021-01-16T18:18:53+5:302021-01-16T18:19:18+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता सोमवारी (दि.१८) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून जनतेला मात्र निकालाची उत्सुकता लागली आहेत.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६१ ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पडले. आता सोमवारी (दि.१८) मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून जनतेला मात्र निकालाची उत्सुकता लागली आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीने निवडणुकीचे वातावरण बदलून टाकले काहींनी तर आपलाच विजय निश्चित असल्याचे घोषित करून टाकले तर काही उमेदवारांनी सोशल मीडियावर आपलाच विजय नक्की असल्याचे वृत्त झळकविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळते. कोरोना विषाणूच्या लोकडाऊन नंतर मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक शांततेत पार पडल्या.कुठे समझोता पद्धतीने तर कुठे बिनविरोध निवड, अश्या विविध पद्धतीने यंदाच्या निवडणुकीत गावागावातील राजकीय मंडळींनी समजदारी दाखवून निवडणूक पार पडली, तर काही ठिकाणी भावा-भावात, सासू सुनामध्ये देखील चुरस पहायला मिळाली.
या निवडणुकीत नागरिकांनी दाखविलेला उत्साह बघता ग्रामपंचायत निवडणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडली.
ग्रामीण भागात यंदा पावसाळा चांगला झाल्या असल्याने शेती कामांची लगबग जोमाने सुरू होती, त्यात मजुरांचा तुटवडा व प्रचार ताफा घेऊन शेतामध्ये उमेदवारांना मोठ्या अडथळ्यांची शर्यती पार करीत प्रचार करावा लागला. पॅनल निर्मिती करतांना तरुण कार्यकर्त्यांची मनधरणी करतांना प्रस्थापित राजकीय मंडळींना देखील बरीच कसरत करावी लागली.
शेतीच्या कामाची लगबग आणि निवडणुकीचे रणशिंग एकाच वेळी फुंकले गेल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली तसेच फॉर्म भरण्यापासून ते सादर करण्यापर्यंत रात्रीचा दिवस उमेदवारांना करावा लागला, ऑनलाइन फॉर्म भरताना मंदावलेले नेटवर्क यामुळेही उमेदवारांचा वेळ वाया गेला त्यामुळे यावर्षीची निवडणूक कोरोनाच्या सावटाखाली पार मात्र शांततेत पार पडली.
- सुनिता कदम, उमेदवार.
येवला तालुक्यातील गावे आणि त्या गावांना झालेली मतदान टक्केवारी मध्ये देवळाने८९, अंगुलगाव ८१, तळवाडे ७८, भुलेगाव ८७, नागडे ८०, मातुलठाण ८१, बल्हेगाव ८४, बोकटे ८६, आहेरवाडी ८६, भारम ८६, रेंडाळे ९२, अनकुटे ८६, डोंगरगाव ८१, पिंपळखुटे बुद्रुक ८८, खामगाव ८८, ममदापुर ८५, खिर्डीसाठे ८०, पन्हाळसाठे ८८, धामोडे ८२, उंदिरवाडी ८५, निमगाव मढ ९१, नांदूर ८८, गणेशपुर ९१, कोळम बुद्रुक ८३, अंगणगाव ९०, धुळगाव ८४, आडगाव रेपाळ ९३, सत्यगाव ७९, नगरसुल ७७, विसापूर ८८, साताळी ८७, बाभूळगाव बुद्रुक ८८, जळगाव नेऊर ७९, आंबेगाव ८९, वाघाळे ८८, मुखेड ७७, अनकाई ७८, पाटोदा ८४, देशमाने बुद्रुक ८४, अंदरसुल ७८, कोटमगाव खुर्द ८७, राजापूर ७९, नेऊरगाव ९०, पुरणगाव ९०, सातारे ८९,
एरंडगाव बुद्रुक ९३ मुरमी ९५, पिंपळगाव लेप ९०, महालखेडा पाटोदा ८६, सोमठाणदेश ८८, ठाणगाव ९०, देवठाण ८७,धामणगाव ८६, विखरणी ९१, सायगाव ८२, खैरगव्हाण ८८, गुजरखेडे ८५, भाटगाव ९४, खरवंडी ८७, रहाडी ८९, कोळगाव ८७.
(फोटो १६जळगाव नेऊर)
जळगाव नेऊर येथील लक्ष्मीबाई सोनवणे यांनी या ९५ वषार्च्या वृध्देने मतदानाचा हक्क बजावला.