मद्यपींवर ‘एक्साइज’ ठेवणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:53 AM2019-12-24T00:53:14+5:302019-12-24T00:54:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आठवडाभरानंतर चालू वर्षाची अखेर होणार आहे. यामुळे मद्यपींकडून आतापासून ‘थर्टि फर्स्ट सेलिब्रेशन’चे बेत आखण्यास ...

A cursory look at the 'excise' on alcoholics | मद्यपींवर ‘एक्साइज’ ठेवणार करडी नजर

मद्यपींवर ‘एक्साइज’ ठेवणार करडी नजर

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तास तपासणी नाके : प्रतिबंधित मद्यतस्करी रोखण्यासाठी नऊ भरारी पथके

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आठवडाभरानंतर चालू वर्षाची अखेर होणार आहे. यामुळे मद्यपींकडून आतापासून ‘थर्टि फर्स्ट सेलिब्रेशन’चे बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात परराज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्मित मद्यसाठ्याची तस्करी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक विभागाच्या स्तरावर नऊ भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. तसेच मद्यप्राशन करण्यापूर्वी नागरिकांनाही तात्पुरता परवाना वैयक्तिक तसेच सेलिब्रेशन पार्टीचा आॅनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्पादन शुल्क विभागाकडून मिळवावा लागणार आहे.
शहरासह जिल्ह्यात सीमावर्ती भागातून होणारी मद्याची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. थर्टि फर्स्ट सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली असल्यामुळे उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले आहे. नागरिकांच्या जीविताला बनावट मद्यापासून धोका पोहचू नये तसेच शासनाच्या महसुलावर परिणाम होऊ नये, म्हणून उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके २४ तास जिल्ह्यांच्या सीमांवर कार्यान्वित केले आहे. तसेच भरारी पथकदेखील नियुक्त करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रासह मद्यपार्टी, डिनरची खास व्यवस्था केली जाते. बहुतांश नाशिककरांना अशा हॉटेल्स दरवर्षी आकर्षित करत असतात. थर्टि फर्स्टच्या औचित्यावर परराज्यात निर्मित झालेले मद्य तसेच बनावट मद्याच्या तस्करीची शक्यता लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकांमार्फत सीमांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. अंबोली, हरसूल, रासबारी, बोरगाव, सुरगाणा, पेठ आदी भागात जिल्ह्याची ३ तर विभागाची ६ अशी एकूण ९ भरारी पथक लक्ष ठेवून आहेत. तसेच या परिसरात २४ तास सीमावर्ती नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Web Title: A cursory look at the 'excise' on alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.