ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 04:36 PM2020-06-29T16:36:03+5:302020-06-29T16:36:55+5:30
देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू करण्यात आली. यामुळे शहरात देना बँकेच्या शाखेवरील कामाचा भार कमी होऊन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु या तिन्ही शाखांपैकी देना बँकेत ग्राहक असलेल्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे हया ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकऱ्यांचे विविध शासकीय अनुदान, शेतीमाल विक्र ीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत असतात. लॉक डाऊन होण्यापूर्वी बँकेत पासबुक भरून देण्याची सुविधा दिली जात असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहारांची माहीती होण्यास मदत होत असे. परंतु लॉक डाऊन संपल्यानंतर बँक कर्मचारी ग्राहकांना पासबुक भरून देत नसल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यावर होणाºया आर्थिक व्यवहारांची माहीती मिळत नाही. अशिक्षीत ग्राहकांना तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बँकांचे आर्थिक व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. शहरातील राष्ट्रीयकृत बँकात शेतकरी खातेदारांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकºयांना आॅनलाईन सुविधेचा उपयोग करता येत नाही. त्यांना खाते पुस्तकावरून त्यांचे खात्यावरील आर्थिक व्यवहार समजणे सोईचे जाते. यामुळे बँकेने महिन्यातून एकदा ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा द्यावी व ग्राहकांची गैरसोय दूर करावी.
- संतोष शिंदे, शेतकरी, देवळा.
शहरातील इतर बँकात ग्राहकांना खाते पुस्तक भरून दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते पुस्तक भरून दिले जात नाही. देना बँकेच्या बेशिस्त कारभाराचा मला अनुभव आला आहे. बँकेकडे मी चेकबुकची मागणी केली होती. १० मार्चला मला चेकबुक पाठवले असल्याचे बँकेने सांगितले, परंतु तीन महिने झाले अद्याप चेकबुक मला मिळालेले नाही.
- निंबाजी आहेर, सेवानिवृत्त शिक्षक, देवळा.