ग्राहक दिन बैठकीला अधिकाऱ्यांचीच दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:34 PM2020-01-01T23:34:25+5:302020-01-01T23:35:39+5:30
देवळा तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बैठक तहकूब केली. यावेळी ग्राहकांप्रति अनास्था दाखविणाºया अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. तहकूब झालेली बैठक १३ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
देवळा : तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बैठक तहकूब केली. यावेळी ग्राहकांप्रति अनास्था दाखविणाºया अधिकाºयांचा निषेध करण्यात आला. तहकूब झालेली बैठक १३ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
गेल्या दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी देवळा तालुका ग्राहक पंचायतीची रद्द झालेली बैठक ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार शेजूळ यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी अहेर, मोबीन तांबोळी, राजपाल अहिरे, संजय भदाणे, शशिकांत चितळे आदी ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. परंतु बैठकीस महसूल विभागाव्यतिरिक्त तालुक्यातील पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन, खते, बी-बियाणे विक्र ेते, बँक, मुद्रांक विके्रते आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्राहक पंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व ग्राहक चळवळीचा उद्देश सफल होत नसल्यामुळे बैठक तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी चर्चा होऊन तहसीलदार शेजूळ यांनी सदर बैठक तहकूब केली. तसेच अनुपस्थित अधिकाºयांना नोटिसा काढण्याचे आदेश दिले. सदरची बैठक १३ जानेवारी रोजी सर्व अधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
ग्राहकांशी संबंधित असलेल्या सर्व विभागांना ग्राहक दिनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले होते; परंतु बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे त्यांना नोटीस देणार आहे. ग्राहक पंचायत सदस्यांच्या मागणीनंतर ग्राहक दिनाची बैठक तहकूब केली आहे. १३ जानेवारी रोजी सर्व अधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक पुन्हा घेण्यात येईल.
- दत्तात्रेय शेजूळ, तहसीलदार, देवळा