ग्राहक खूश : पेट्रोल, डिझेलचे उतरले दर
By admin | Published: June 18, 2017 12:55 AM2017-06-18T00:55:20+5:302017-06-18T00:56:08+5:30
पेट्रोल पंपचालकांना ८० लाखांचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शुक्रवारपासून तेल कंपन्यांकडून इंधनाचे दररोजचे दर जाहीर करणे सुरू झाल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना होत असला तरी, जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालकांना गेल्या दोन दिवसांत जवळपास ८० लाखांचा फटका बसला आहे. यापुढे इंधनाचे जे काही दर तेल कंपन्या जाहीर करतील त्याच दरात ग्राहकांना इंधन खरेदी करावे लागणार आहे, मात्र दर वाढल्यास त्याचा लाभ पंपचालकांना होणार आहे.
तेल कंपन्यांनी देशभरासाठी हा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शुक्रवारसाठीचे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर करण्यात आले, त्यात दोन्ही
इंधनाचे दर एक रुपये वीस पैसे या दराने कमी झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर शनिवारीदेखील काही पैसे कमी झाल्याने साधारणत: दोन दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन रुपयांनी घट झाल्याचे पेट्रोलपंपचालकांचे म्हणणे आहे. तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे
कमी झालेल्या इंधन दरामुळे वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, तेल कंपन्यांच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष फटका मात्र पेट्रोल पंपचालकांना बसू लागला आहे. इंधनाच्या दररोजच्या बदलत्या दराला पेट्रोल पंपचालकांनी विरोध दर्शवून त्याविरोधात देशपातळीवर आंदोलनही उभे केले असून, सध्या काळ्या फिती लावून पंपचालकांवर संकट
तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे पंपचालकांना दोन दिवसांत मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेल कंपन्यांच्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा. देशपातळीवर तेलाचे दर कोसळत आहेत हे दोन दिवसातच स्पष्ट झाले आहे. तेलाचे दर वाढल्यावर पंपचालकांना फायदा होईल, असे सांगितले जाते. पण, त्यात अनिश्चितता आहे. - मनोज चोरडिया, पेट्रोलपंपमालक