ग्राहकांनी जाणून घेतले हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:58 PM2020-01-05T23:58:42+5:302020-01-05T23:59:13+5:30

कामगार कल्याण मंडळाने राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ग्राहक चळवळ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता.

Customers know right | ग्राहकांनी जाणून घेतले हक्क

सिन्नर येथे ग्राहक सप्ताह समारोप प्रसंगी बोलताना अनिल बोरसे, व्यासपीठावर अनिल धनराव, राजेंद्र नन्नावरे, गणेश तांबोळी आदी.

Next
ठळक मुद्देग्राहक सप्ताह : कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम

सिन्नर : येथील कामगार कल्याण मंडळाने राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ग्राहक चळवळ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता.
यामध्ये ग्राहकांचे हक्क तसेच कर्तव्ये, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक चळवळ याविषयी ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दत्ता शेळके, तालुका संघटक विश्वनाथ शिरोळे तसेच जनसंपर्कप्रमुख डॉ. श्यामसुंदर झळके यांनी आपली मते मांडली. समारोपाच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निबंध तसेच रांगोळी स्पर्धा घेऊन त्याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी घेतलेल्या निबंध स्पर्धेतील संचिता मांडे, ओंकार उगले, शुभम भावले यांना अनुक्र मे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने प्रमाणपत्र, रोख पारितोषके देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेत कांचनमाला तांबोळी, शांता कुºहाळे, मंगल यादव यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
यावेळी सहायक कल्याण आयुक्त सयाजी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल धनराव, जया दिघोळे यांनी काम पाहिले. रांगोळी व निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार व गुणवंत कामगार गणेश तांबोळी उपस्थित होते. प्रास्ताविकात केंद्रप्रमुख अनिल बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमांची तसेच शासकीय सवलत योजनांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कविता कासार, लीलावती विभांडीक, अनिता भगत आदींनी प्रयत्न केले. अनिल बोरसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
उत्तम आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहाराबरोबरच, नियमित व्यायाम, प्राणायाम व योगा करणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार केल्याने आरोग्य निरोगी राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण ही बाब विसरत चाललो आहोत.
- राजेंद्र नन्नावरे, योगशिक्षक

Web Title: Customers know right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.