नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

By admin | Published: November 11, 2016 10:46 PM2016-11-11T22:46:19+5:302016-11-11T22:54:14+5:30

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

Customers' seizure crowd to change currency | नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी

Next

ओझर : सकाळपासून लांबच लांब रांगाओझर : केंद्र सरकारने रद्द केलेल्या ५०० व १०००च्या नोटा बदली करून घेण्यासाठी ओझरकरांनी प्रत्येक बँकेत तोबा गर्दी केली असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. येथे बँक आॅफ महाराष्ट्र, बडोदा बँक, एस बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, नाशिक मर्चण्ट बँक तसेच स्थानिक सहकारी बँका आणि पतसंस्थेंमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती.
बुधवारी अचानक पुकारलेल्या बंदमुळे काहींची मात्र तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळपासून लोकांनी बँकांसमोर रांगा लावून गर्दी केली होती. खात्यात पैसे भरायला कुठलेही निर्बंध नसून फक्त पैसे काढताना मात्र चार हजारची मर्यादा दिल्याने याचा थेट परिणाम बाजारामध्ये दिसून आला आहे.
पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी मात्र पैसे संपल्यामुळे काही लोकांना परत जावे लागले असून, काही सहकारी आणि राष्ट्रीय बँकांमध्येदेखील पैशांचा तुटवडा झाला. यात गडबड गोंधळ मात्र कुठे झालेला दिसला नाही तरीदेखील सामान्य माणसाला चार हजारासाठी मात्र चार पाच तासाची प्रतीक्षा करावी लागते आहे.
महामार्गावरील पेट्रोल पंपवाल्यांना मात्र तोंड देता देता नाकी नव आले असून, सुटे करण्याच्या बहाण्याने अनेक जण हजारची नोट देऊन शंभरचे पेट्रोल टाकताना आढळले. यामुळे मात्र काही ठिकाणी तर बाचाबाचीदेखील झाली. हॉटेलमध्येदेखील हीच परिस्थिती दिसून आल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडीवाल्यांना मात्र जेवायची पंचायत झाली कारण एकही हॉटेल अथवा ढाबा त्यांच्याकडून पाचशे आणि हजारच्या नोटा घेत नव्हते. काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाही, अशी पाटीदेखील लावली आहे. सामान्य माणसाची हिशोब करताना मात्र अजून दिवस हेळसांड होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Customers' seizure crowd to change currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.