अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून कटक मंडळे मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:05 AM2018-04-05T01:05:59+5:302018-04-05T01:05:59+5:30

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून, यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एसएमआरके महाविद्यालयातील गृहविज्ञान शाखा व हिंदी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांचा अपवाद असून, या दोन्ही महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली.

Cutting circles free from the 11th annual online entry process | अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून कटक मंडळे मुक्त

अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून कटक मंडळे मुक्त

Next

नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून, यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एसएमआरके महाविद्यालयातील गृहविज्ञान शाखा व हिंदी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांचा अपवाद असून, या दोन्ही महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली.  रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि. ४) अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्रवेशप्रक्रिया समन्वयक वैभव सरोदे, अशोक बागुल, सुनीता धनगर, आर. व्ही. पाटील आदी शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिलीप गोविंद म्हणाले, देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने प्रवेश घेताना अनेकदा शहरातील महाविद्यालये मिळाल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील सुभाष गुजर कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमती विमलाबेन खमजी तेजुकीया महाविद्यालय व नूतन कनिष्ठ महाविद्यालय आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले आहे, तर महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पंचवटीतील उन्नती कनिष्ठ महाविद्यालयाची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यासाठी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत शाळास्तरावर मेळावे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर मे महिन्याच्या पूर्वार्धात म्हणजेच पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात माहिती पुस्तिका उपलब्ध करून
सात ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार
आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात सात ठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांची रचना झोननुसार करण्यात आली असून, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना त्या भागाशी संबंधित केंद्रात प्रवेशप्रक्रियेसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरातील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयीची सर्व माहिती त्यांच्या शाळांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यकता भासल्यासच संपर्क साधण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. मार्गदर्शन कें द्राची सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांसाठी नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर विद्यार्थिनींसाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कें द्र सुरू करण्यात येणार आहे. दिल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका व देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रात गेल्यावर्षी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेशप्रक्रिया यशस्वी केल्यानंतर यावर्षी कटक मंडळ परिक्षेत्र या प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आल्याने शिक्षण विभागावरील भार काही अंशी कमी झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, नाशिक शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कामाला लागले असून, महानगरपालिका परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
झोननिहाय मार्गदर्शन केंद्र
झोन-१ : गंगापूररोड, पंडित कॉलनी, एसटी कॉलनी, प्रमोदनगर, रामवाडी, जुना आग्रारोड, सारडा सर्कल आदी परिसरासाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, तर गंगापूर गाव, सोमेश्वर, ध्रुवनगर, सोमेश्वर कॉलनी, गणेशनगर या परिसरासाठी गंगापूररोड भागातील सीएमसीएस महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार
आहे.
झोन-२ : शरणपूर, टिळकवाडी, तिडके कॉलनी, गोविंदनगर, सद्गुरुनगर व जुने नाशिक या परिसरासाठी बीवायके महाविद्यालयात केंद्र असणार आहे, तर सातपूर कामगारनगर, एमआयडीसी, पिंपळगाव बहुला, सातपूर-अंबड लिंकरोड या भागासाठी भोसला मिलिटरी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र असणार आहे.
झोन-३ : पंचवटी, औरंगाबादरोड, आडगाव, द्वारका या भागासाठी पंचवटी महाविद्यालयात, तर मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद परिसरासाठी ए. पी. पटेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, निमाणी, पंचवटी येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
झोन-४ : सिडको, कामठवाडे, अंबड व पाथर्डी फाट्यासाठी सिडकोतील केएसडब्ल्यू सिडको महाविद्यालयात आणि इंदिरानगर, पाथर्डीगाव व वडाळागाव भागासाठी इंदिरानगरमधील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र स्थापन क रण्यात येणार आहे.
झोन-५
नाशिकरोड, जेलरोड, चेहेडी, देवळालीगाव, बिटको, दत्तमंदिर,गांधीनगर, कॅनॉलरोड व नारायण बापूनगर परिसरासाठी नाशिकरोड बिटक ो महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Cutting circles free from the 11th annual online entry process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.