सायबर भामट्यांनी केली महिलेची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक
By नामदेव भोर | Published: June 14, 2023 06:37 PM2023-06-14T18:37:16+5:302023-06-14T18:37:40+5:30
नाशिक : खुटवटनगर येथील एका महिलेची सायबर भामट्यानी तब्बल १८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...
नाशिक : खुटवटनगर येथील एका महिलेची सायबर भामट्यानी तब्बल १८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सायबर भामट्यांनी पिडित महिलेला वर्क फ्रॉमच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या खात्यांवर टप्याटप्याने पैसे भरण्यास सांगत पिडित महिलेच्या बँके खाते व मोबाईलच्या माध्यमातन ही रक्कम घेवून फसवणूक केली असून पिडित महिलेने सायबर पोलि, ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांनी गेल्या काही दिवसात फसवणुकीचा नवा फंडा शोधून काढला असून बेरोजगार तरुणांना, नागरिकांना अधिक उत्पन्नाचे अमिष दाखवून आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. नाशिकच्या खुटवटनगरमधील एका महिलेच्या बाबतीतही अशीच घटना घडली असून सायबर भामट्यांनी महिलेची तब्बल १८ लाख १८हजार ३५४ रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले असून रोज किमान तीन ते चार प्रकरणांमध्ये सायबर भामट्यांकडून वर्क फ्रॉम होम, पार्ट टाईम वर्क अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करून ऑलाईन फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.