सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 08:55 PM2020-07-22T20:55:47+5:302020-07-22T21:02:36+5:30

४ जुलै २०१९ पासून अद्यापपावेतो प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांनुसार एकूण ९५ गुन्हे सायबर पोलिसांकडून मंगळवारी (दि.२१) दाखल केले गेले.

Cyber thieves: Robbery of Rs 23 lakh from 95 people's bank accounts | सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट 

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देविविध आमीष दाखवून केला हात साफसहा महिन्यांत साडेतीनशे नागरिकांना गंडासायबर पोलिसांपुढे उभे राहिले आव्हान

नाशिक : शहरात सायबर चोरट्यांनी मागील पाच महिन्यात अधिकच लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरात एकूण ९५ नागरिकांना विविध आमीष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बॅँक खात्यातून हजारो ते लाखो रूपयांचा अपहार करत एकूण २२ लाख ९७ हजार १२९ रूपये इतकी रक्कम परस्पर ऑनलाइन लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२२) समोर आला.
सायबर चोरट्यांनी विविध बॅँकांच्या ग्राहकांशी संपर्क साधत त्यांना क्रेडिटकार्डची रक्कम मर्यादा वाढवून देणे, रिवॉर्ड पॉइंट घेणे, कॅशलेस मेडिकलचा लाभ मिळवून देणे असे विविध आमीष दाखवून विश्वास संपादन केला तसेच मुळ कागदपत्रांची पडताळणी, डेबीट, क्रेडिट कार्डांचे व्हेरीफिकेशन करायचे सांगून सायबर चोरट्यांनी
४ जुलै २०१९ ते १४ जुलै २०२०या वर्षभराच्या कालावधीत नागरिकांची बॅँक खाती हळुहळु रिती करण्याचा सपाटाच लावल्याचे समोर आले आहे. यामुळे नाशिक शहर सायबर पोलीस दलदेखील हादरले आहे. या गुन्हेगारांची ‘लिंक’ शोधून पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांपुढे उभे राहिले आहे.


५ ते ४० हजारापर्यंतची लूट
४ जुलै २०१९ पासून अद्यापपावेतो प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांनुसार एकूण ९५ गुन्हे सायबर पोलिसांकडून मंगळवारी (दि.२१) दाखल केले गेले. यानुसार सायबर चोरट्यांनी या कालावधीत या ९५ तक्रारदारांचे कमीत कमी प्रत्येकी ५ ते जास्तीत जास्त ४० हजारापर्यंतची रक्कम ऑनलाइन  बॅँक खात्यातून गायब केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण २३ लाखांच्या घरात या ९५ तक्रारदारांची आर्थिक फसवणूक पोहचली आहे.
-
ऑनलाइन बॅँकींगचा वापर हा अधिक सतर्कतेने करायला हवा; मात्र तसे होताना शहरात दिसत नाही. ऑनलाइन आर्थिक फसवणूकीचा आकडा वाढत आहे. नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारांची ‘लिंक’ शोधली गेली आहे; मात्र लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट यामुळे परराज्यात पोहचणे शक्य होत नाही. झारखंड, राजस्थान, बिहार या तीन राज्यांमधून सध्या सायबर चोरट्यांनी शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे.
-देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Cyber thieves: Robbery of Rs 23 lakh from 95 people's bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.