माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इगतपुरीत सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:25 PM2020-12-22T18:25:27+5:302020-12-22T18:26:00+5:30

इगतपुरी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्याच्या अनुषंंगाने इगतपुरी शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इगतपुरी नगर परिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१९) इगतपुरी शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Cycle rally at Igatpuri under my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इगतपुरीत सायकल रॅली

इगतपुरी नगर परिषदेपासून निघालेल्या सायकल रॅलीत सहभागी निर्मला गायकवाड- पेखळे आदि.

Next
ठळक मुद्देनगर परिषदेजवळ रॅलीचा समारोप झाला.

इगतपुरी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ह्यमाझी वसुंधरा अभियानह्ण राबविण्याच्या अनुषंंगाने इगतपुरी शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इगतपुरी नगर परिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१९) इगतपुरी शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शहरातील युवा वर्ग, तसेच सायकलपटु यांनी सहभाग नोंदवुन चांगला प्रतिसाद दिला. रॅलीची सुरुवात सकाळी खालची पेठ येथून निघून राममंदिर ते गावात फिरून नगर परिषदेजवळ रॅलीचा समारोप झाला.

या प्रसंगी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे किरण फलटणकर, सुनिल आहेर, प्रदिप रजपुत, अविनाश कुलकर्णी, डॉ.प्रदिप बागल यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून घोटी येथील सायकलिस्ट डॉ. कैलास गायकर, निलेश बोराडे उपस्थित होते. मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी स्वागत केले. तसेच इगतपुरी शहरात महिन्याच्या प्रत्येक १५ तारखेला सायकल रॅली घेतली जाणार असे घोषित केले. अजुनही नवनविन उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी इगतपुरी शहरातील सर्व जनतेस आवाहन केले. ही सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
 
Web Title: Cycle rally at Igatpuri under my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.