मुंजे यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रबोधिनीतर्फे सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:34 AM2018-12-13T01:34:35+5:302018-12-13T01:34:56+5:30
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाच्या अंतर्गत संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात विद्या प्रबोधिनी शाळेतून करण्यात आली. ही रॅली रामशेज किल्ल्यापर्यंत नेण्यात आली.
नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाच्या अंतर्गत संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात विद्या प्रबोधिनी शाळेतून करण्यात आली. ही रॅली रामशेज किल्ल्यापर्यंत नेण्यात आली.
या रॅलीचा मुख्य उद्देश पर्यावरण जागृती, र्इितहास विषयाची आवड निर्माण करणे, तसेच किल्ल्याचे जतन व संरक्षण करणे हा आहे. सायकल रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. शाळा ते रामशेज किल्ला आणि परत शाळेत असे एकूण ३५ किमी अंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी पार केले. रामशेज किल्ल्यावर गेल्यावर डॉ. मुंजे याच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्र माची सुरुवात केली. किल्ल्याची साफसफाई करून त्याचे महत्त्व आणि किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेचे देवरे, संतोष जगताप, हेमलता खैरनार यांनी माहिती सांगितली.
दिल्ली येथे डॉ. मुंजे यांची जयंती
च्दिल्ली येथे डॉ. मुंजे यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील कार्यक्र मात भोसला मिलिटरी स्कूल नाशिक आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांच्या परेडचे आयोजन केले होते. यानंतर परेडमधील विद्यार्थ्यांनी आर. के. आश्रम स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. मुंजे यांच्या स्मारकापर्यंत संचलन केले. या कार्यक्र मासाठी व्यासपीठावर निवृत्त एअरमार्शल अजित भोसले, विदेश राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंग, बबिता भरीजा, कमोडर आर. एस. धनकर, राजपाल राजपूत, सुरेश कुलकर्णी, शीतल देशपांडे, सदस्य प्रशांत नाईक उपस्थित होते.