गोल्फ क्लबवर ‘सायकल शेअरिंग
By admin | Published: April 6, 2017 02:10 AM2017-04-06T02:10:18+5:302017-04-06T02:10:30+5:30
’नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत महापालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रॅकवर ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे.
’नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत महापालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या सहकार्याने गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे. टीसीएसच्या टीमने महापौर रंजना भानसी यांच्यासमोर या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले.
नाशिकमध्ये स्थापन झालेल्या टीसीएस इनोव्हेन्शन सेंटरशी महापालिकेने करारनामा केलेला आहे. टीसीएसने विकसित केलेले प्रकल्प महापालिका राबविणार आहे. त्याचाच भाग म्हणून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सायकल शेअरिंग प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रकजवळ सायकल स्टेशन तयार केले जाणार असून त्याची नोंदणी करणाऱ्यांना स्वॅप कार्ड दिले जाणार आहे. प्रतितासाला काही शुल्क आकारून सदर सायकलींचा वापर मैदानापुरता करता येणार आहे. सुरुवातीला सहा सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सायकलींना जीपीएस ट्रॅकिंग बसविण्यात आलेली आहे. या प्रकल्पामुळे व्यायामासाठी सायकली उपलब्ध होतील.