सायकल ट्रॅक खुला करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:50+5:302021-04-29T04:11:50+5:30

रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी नाशिक : महानगरातील विविध रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांनी अनेक ठिकाणी, चौकांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ...

The cycle track should be opened | सायकल ट्रॅक खुला करावा

सायकल ट्रॅक खुला करावा

Next

रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी

नाशिक : महानगरातील विविध रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांनी अनेक ठिकाणी, चौकांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. आता कोरोनाच्या निर्बंधांमुळे रस्त्यावर नागरिक नसल्याने, लवकरात लवकर या रस्त्यांची डागडुजी करून महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांच्या कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अतिवापराने बालकांना नेत्रविकार

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा बंद आणि परीक्षादे‌खील झाल्या नसल्याने, बहुतांश विद्यार्थी मोबाइल आणि टीव्हीतच रममाण झाले आहेत.. त्यात काही क्लासही ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर राहात असल्याने विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे गत वर्षाप्रमाणेच पुन्हा बालकांमध्ये नेत्रविकार वाढत आहेत.

मोकाट श्वानांकडे दुर्लक्षामुळे नाराजी

नाशिक : शहरातील गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काही वेळा श्वान वाहनांच्या पाठीमागे धावत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते, तर कधी दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडत असल्याने, या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जुने नाशिक परिसरात डासांचा प्रादुर्भाव

नाशिक : जुने नाशिक परिसरातील जुने वाडे, पडके वाडे, खड्ड्यांच्या जागांमध्ये पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात आधीच कोरोनाने थैमान घातले असताना, डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जुने नाशिकमध्ये दर आठवड्याला धूर फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: The cycle track should be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.