गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 02:50 PM2021-06-14T14:50:09+5:302021-06-14T14:50:56+5:30

गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली.

Cycling on the wall of Gangapur dam; 35 expensive bicycles seized | गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त

गंगापुर धरणाच्या भींतीवर सायकलिंग; ३५ महागड्या सायकली जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देशासकिय नियमांची उच्चशिक्षित युवकांकडून पायदळी

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारा अत्यंत महत्त्वाच्या गंगापूर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन शिथिल होताच हौशी सायकलपटूंची घुसखोरी वाढू लागली आहे. शहरातील काही हायप्रोफाईल सायकलपटू थेट भिंतीच्या वरील बाजूने असलेल्या रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.१३) उघडकीस आला. जलसंपदा विभागाने ग्रामिण पोलिसांच्या मदतीने कारवाई करत ३५ सायकली जप्त केल्या आहेत.
सायकल चळवळ रुजविणारे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख बनत आहे. शहरातील विविध सायकलपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकाविला आहे. सायकलचा सराव हा रस्त्यांवर केला जाणे अपेक्षित आहे; मात्र काही हौशी मंडळींकडून आपल्या सायकली थेट गंगापुर धरणासारख्या अत्यंत संवेदनशील व प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरात धाडल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील अशा काही हौशी हुल्लडबाज सायकलपटूंना रविवारी जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने चांगलाच दणका दिला. त्यांच्या ताब्यातील महागड्या सायकली जप्तीची मोहीम राबविली. दिवसभरात तब्बल ३५ सायकली जप्त करण्यास प्रशासनाला यश आले.

विकेंड ला गंगापूर धरणाच्या संरक्षण भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापुर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. या तक्रारींची दखल घेत गंगापूर धरणाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी सायकल जप्तीची मोहीम राबविली. शनिवारी दहा आणि रविवारी २५ अशा एकुण ३५ सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Web Title: Cycling on the wall of Gangapur dam; 35 expensive bicycles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.