कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:11 AM2021-06-03T04:11:24+5:302021-06-03T04:11:24+5:30

नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करून संघटनेच्या ...

Cyclist Foundation's initiative to help with Corona too! | कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार !

कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार !

googlenewsNext

नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करून संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना साथीच्या काळातही एक टनपेक्षा अधिक धान्य, किराणा वाटप, कुठे रक्तदान, प्लाझ्मादान, कधी सायकलदान, कधी वह्या, पुस्तके दान, कधी औषधे वाटप, तर कुठे जनजागृती यांसह विविध उपक्रम करण्यात नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

जगभरात ०३ जून हा आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांवर महामारीच्या तांडवामुळे आणि त्या अनुषंगाने असलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाचे सावट पडले आहे. मात्र, तरीही नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनतर्फे यंदादेखील सायकल दिनानिमित्त गरजू हुशार विद्यार्थ्यांना सायकल्सचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या काळातदेखील गरीब विद्यार्थ्यांना सायकली, तसेच पुस्तके वाटप करण्यात आली. वाड्या पाड्यांवर जाऊन औषध वाटप, तसेच कोरोनाची माहिती आणि खबरदारी यावर प्रबोधन केले. संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्या वाढदिवशी दिलेल्या धान्याचे, किराणा सामानाचे वितरण वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बाल्याश्रम, कोरोना काळात अडचणीत असलेल्या कुटुंबांना, तुरुंगातून बाहेर आलेल्या, पण हाती काम नसलेल्या बंदीवानांना, धंदा गोत्यात आलेल्या कलाकारांना करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या स्ट्रेट हॅँडल ड्राईव्ह आणि सायकल फॉर चेंज यासारख्या कार्यक्रमात सहयोग दिला. त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे कारगिल दिन, मैत्रदिन, स्वातंत्र्य दिन, अवयवदान दिन, त्र्यंबकेश्वर फेरी, राष्ट्रीय क्रीडा दिन, शिक्षक दिन, हुतात्मा दिन, पत्रकार दिन, योग दिन, प्रजासत्ताक दिन ई. दिनाचे औचित्य साधून त्या दिवशी साजरे केले. या व्यतिरिक्त राष्ट्रीय मतदार दिन, कर्करोग, पर्यावरणपूरक गणेश पूजा, फटाकेरहीत दिवाळी या. विषयांवर जनप्रबोधन केले गेले. त्याशिवाय महिलांसाठी खास नवदुर्गा उत्सव, कोजागिरी, जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने आणि बहुसंख्येने साजरा केला गेला. त्यांच्यासाठी विशेष राईड्स ठेवून प्रोत्साहित केले जात आहे. यावर्षीदेखील शेगाव वारी उत्साहात झाली. तसेच शिवनेरी येथेदेखील लक्षणीय संख्येने सायकलस्वार जाऊन छत्रपतींच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन आले. सायकलिंग, समाजप्रबोधन, गरजूंसाठी साहाय्य, प्रशासनाच्या उपक्रमात सहभाग, पर्यावरण संवर्धन, विविध विषयांवर जनजागृती अशा अनेक उपक्रमाद्वारे एनसीएफची वाटचाल कोरोना काळातही सुरूच आहे.

कोट

गरजूंसाठी अनाजदान या अभिनव उपक्रमाद्वारे संघटनेच्या सदस्यांनी तब्बल एक टनापेक्षा अधिक वजनाचे धान्य, किराणा सामानाचे वाटप कोरोना काळात केले. त्याशिवाय रक्तदानासाठी सदस्यांनी पुढे येऊन एकूण ४०० युनिट्स रक्तदान, प्लाझ्मादानदेखील करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून सायकल प्रसारासोबतच समाजाची गरज ओळखून त्याद्वारे मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. तसेच भविष्यातदेखील अधिकाधिक सायकलप्रसार करण्यावर भर देऊन नाशिक प्रदूषणमुक्त ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन

फोटो

०२ वानखेडे

Web Title: Cyclist Foundation's initiative to help with Corona too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.