पाणीपुरी कारखान्यात सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:42 AM2017-12-27T00:42:44+5:302017-12-27T00:43:00+5:30
हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेले तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़ या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
नाशिक/ पंचवटी : हिरावाडीतील शिवकृपानगर येथील नंदिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला लागून असलेल्या दोन मजली इमारतीच्या छतावरील पाणीपुरी बनविण्याच्या कारखान्यास मंगळवारी (दि. २६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या कारखान्यातील खाद्यतेलाने पेट घेतल्यानंतर त्याजवळ ठेवलेले तीन गॅस सिलिंडरने पेटले व त्यांच्या स्फोटाने संपूर्ण शिवकृपानगर परिसर हादरून गेला़ या घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. हिरावाडीतील शिवकृपानगर येथे राहणाºया केशव मकलू चौहाण यांचा पाणीपुरी बनविण्याचा व्यवसाय आहे.
पाणीपुरी कारखाना अनधिकृत?
हिरावाडीतील शिवकृपानगर येथे राहणाºया केशव चौहान या परप्रांतीयाने गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीच्या छतावर पाणीपुरी बनविण्याचा कारखाना थाटला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मनपा उद्यानालगत व भरवस्तीत इमारतीच्या छतावरच अनधिकृतपणे बांधकाम करून पाणीपुरी बनविण्यासाठी गॅस भट्टी पेटविली जाते़ महापालिकेने भरवस्तीत या कारखान्यास परवानगी दिलीच कशी, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
शिवकृपानगरमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ कारखाने
शिवकृपानगर परिसरात काही परप्रांतीय भाडेतत्त्वावर घरे घेऊन घरातच गॅसभट्टी लावून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करतात़ भरवस्तीत विनापरवाना खाद्यपदार्थ बनविण्यासाठी भट्ट्या लावल्या जात असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़ मात्र याबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.