डी. एल. एड. साठी ३१ आॅगस्टपर्यंतच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:40 AM2020-08-24T00:40:46+5:302020-08-24T00:41:16+5:30

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.

D. L. Ed. Admission only till 31st August | डी. एल. एड. साठी ३१ आॅगस्टपर्यंतच प्रवेश

डी. एल. एड. साठी ३१ आॅगस्टपर्यंतच प्रवेश

Next
ठळक मुद्दे२५ सप्टेंबरपासून प्रथम वर्ष :खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुणांची अट

नाशिक : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि सविस्तर नियमावली राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. डी. एल. एड. प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) इयत्ता बारावी शाखेतील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के, तर खुला संवर्ग वगळून इतर प्रवर्गासाठी ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले असून सर्वांसाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आहे. त्याशिवाय पडताळणीसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित अध्यापक महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया १ ते २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी अशी सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर २५ सप्टेंबरपासून प्रथम वर्ष सुरू केले जाणार आहे.

Web Title: D. L. Ed. Admission only till 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.